कोकण

देवगड अर्बन बँक सीईओ पद रिक्त

CD

देवगड अर्बन बँक
सीईओ पद रिक्त

काँग्रेसचे निवेदन; नियुक्तीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः येथील दि देवगड अर्बन को-ऑप. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) या रिक्त पदावर नवीन नियुक्ती करण्याची येथील तालुका काँग्रेसची मागणी आहे. आपल्या मागणीचे निवेदन काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी व जिल्हा कार्यकारिणी सचिव उल्हास मणचेकर यांनी बँक अध्यक्षांना देण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांकडे आज दिले.
श्री. कुळकर्णी आणि श्री. मणचेकर यांनी बँकेत कर्मचाऱ्यांची भेट घेतली. अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देवगड अर्बन बँक ही फार जुनी बँक आहे. त्यावेळी समाजातील मान्यवरांनी नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या हितासाठी अर्बन बँकेची निर्मिती केली. मागील सुमारे दोन वर्षापूर्वी तत्कालीन संचालकांनी बँकेचा कारभार पारदर्शक व आर. बी. आय. च्या निकषांत बसवून तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य करण्यासाठी बँकिंगमधील अनुभवी व्यक्ती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर एका व्यक्तीची नियुक्ती केली. ते बँकेचा योग्यरित्या कारभार करत असताना त्यांनी अचानक एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला. त्यांना पद सोडून जाण्याची वेळ आली. ही अवस्था बँकेच्या हिताला हानीकारक आहे. आता परत नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची भरती करावी व बँक कशी प्रगतीपथावर जाईल याचा विचार करावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT