कोकण

राजापूर-खांब, रोहित्र न बसवल्यास वीजबिल भरणार नाही

CD

खांब, रोहित्र न बसवल्यास वीजबिल भरणार नाही

कोळवणखडी ग्रामस्थांचा इशारा ; महावितरणला निवेदन

राजापूर, ता. १८ ः तालुक्यातील कोळवणखडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गंजलेल्या खांबामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोकादायक खांब तत्काळ बदलावेत, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा अन्यथा गावातील एकही कुटुंब वीजबिल भरणा करणार नाही, असा इशारा कोळवणखडी ग्रामपंचायतीच्यावतीने महावितरण विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे.
तालुक्यातील कोळवणखडी गावातील गंजलेल्या खाबांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत आहे; मात्र महावितरणकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत गंजलेले खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तसेच आमराईवाडी रस्त्यालगत बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी असून घरांची संख्या वाढल्याने त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे. तसेच खालची मोरेवाडी येथे थ्री फेज लाईन व जुन्या ट्रान्सफॉर्मरची जागा अडचणीची असून हा ट्रान्सफॉर्मर हा दिलावर मुकरी यांच्या जागेमध्ये बसवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास गावातील एकही कुटुंब वीजबिल भरणार नाही, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

अमेरिकन लोक चीनमधून मागवत घर बांधण्याचं सामान! बाजारात ‘चायना होम्स’ची एंट्री; हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय?

'मटका किंग'मध्ये एवढी मोठी चूक? नागराज मंजुळे विसरले पण प्रेक्षकांच्या नजरेतून नाही सुटली ती गोष्ट, म्हणतात- अरे...

Pune Domestic Violence Case: महिला पोलीस अंमलदाराचाच सासरकडून छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik News : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांकडून मृत्युपत्राची नोंद; ॲड. एकबोटे यांना ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT