कोकण

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी पुढे या

CD

17040
कणकवली : येथील भालचंद्र आश्रम संस्थानच्या शिष्यवृत्ती वर्ग प्रारंभ कार्यक्रमात बोलताना देवगडचे तहसीलदार रमेश पवार.


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी पुढे या

तहसीलदार पवार; कणकवलीत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा प्रारंभ

कणकवली, ता.१८ : भालचंद्र आश्रम संस्थानच्या धर्तीवर जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करावेत, असे आवाहन देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांनी केले.
भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला. त्‍याचा प्रारंभ तहसीलदार रमेश पवार यांनी केला. यावेळी संस्थानाचे अध्यक्ष पी. डी. कामत, दादा नार्वेकर, मुरलीधर नाईक, प्रा.दिवाकर मुरकर, शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर, वर्षा करंबेळकर, व्यवस्थापक विजय केळुसकर, प्रकाश परब, काशिनाथ कसालकर रावजी परब, शरद हिंदळेकर, श्रीकृष्ण कांबळी, मंगेश तेली, व्ही. आर. सुतार, सदानंद गावकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, गजानन उपरकर यांनी प्रास्ताविक केले. किरण कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. सुहास आरोलकर यांनी आभार मानले.
---
चौकट
पाल्याला परीक्षेसाठी प्रोत्साहित करा
श्री.पवार म्‍हणाले, बारा वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी निकालात अग्रस्थान राखले आहे. इथल्‍या मुलांमध्ये गुणवत्तेची कमी नाही तर मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. भालचंद्र आश्रम संस्थानने शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सुरू करून आदर्श घालून दिला आहे.’’ सुरेश कामत म्‍हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करावे. इथल्‍या विद्यार्थ्यांना आवश्‍यक सर्व मार्गदर्शन आम्‍ही संस्थेच्यावतीने करू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT