कोकण

अरविंद रावराणेंची उमेदवारीसाठी धडपड

CD

अरविंद रावराणेंची उमेदवारीसाठी धडपड

रोहीत पावसकर; ‘ती’ टीका वरिष्ठांना खुश करण्यासाठी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १८ ः ठाकरे युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांवर अरविंद रावराणेंनी केलेली टिका ही वरिष्ठांना खुश करण्यासाठी असून आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठीची धडपड असल्याची टिका युवासेनेचे विभागप्रमुख रोहीत पावसकर यांनी येथे केली.
ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख नाईक यांनी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट दिल्यानंतर आमदार नीतेश राणेंवर टीका केली होती. त्यानंतर माजी सभापती अरविंद रावराणे यांनी श्री. नाईक यांच्यावर टीका केली होती. आता युवासेनेचे विभागप्रमुख यांनी प्रसिद्धीपत्रकातून श्री. रावराणे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की ‘‘श्री. रावराणे यांनी आपले भाजप पक्षातील स्थान काय आहे हे पाहावे. केवळ वरिष्ठांना खुश करण्यासाठी टीका करू नये. ग्रामीण रूग्णालयातील
समस्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी श्री. नाईक यांच्यासमोर मांडल्या आहेत. त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे श्री. नाईक यांनी टीका केली, असे म्हणणेच चुकीचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे होते; मात्र, तत्पुर्वी गेली अनेक वर्षे या जिल्ह्यावर नारायण राणेंचीच सत्ता होती. गेली नऊ वर्षे नीतेश राणे आमदार आहेत. याचा विसर श्री. रावराणेंना सोयीस्कर पडला आहे. आमदारांनी ग्रामीण रूग्णालयाकडे लक्ष का दिले नाही?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. डिझेल नसल्यामुळे जनरेटर बंद, रूग्णवाहिका बंद, रक्ततपासणी मशीन बंद ही स्थिती कोणामुळे आली? याचा विचारही करावा. दोन दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने दारू पिऊन धिंगाणा घातला. गेले सात-आठ महिने त्याचे वर्तन असेच आहे. त्याकडे कुणी लक्ष का देत नाही? त्यामुळे श्री. रावराणे यांनी या प्रश्नांवर पहिले बोलावे, त्यानंतर त्यांनी श्री. नाईक यांच्यावर टीका
करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT