Naringi River Flow Sakal
कोकण

Kokan Rain Update : खेडमध्ये मुसळधार; दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प, जगबुडी, नारिंगी पात्राबाहेर

खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. खेड तालुक्यात १५१ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १४४० मिमी पावसाची नोंद झाली.

सकाळ वृत्तसेवा

खेड - खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. खेड तालुक्यात १५१ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १४४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नद्यांच्या लगत असलेली शेती व वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत.

पावसाचा जोर वाढत असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. संततधार पावसामुळे खेड मटण-मच्छीमार्केट परिसरासह देवणे बंदर भागात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले.

त्यामुळे मच्छीमार्केट परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी सतर्कतेचे पाऊल म्हणून दुकानातील माल अन्य साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरवात केली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, १७ तारखेपासूनच खेडमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. प्रशासनाने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सावधानता व सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतीची लावणीची कामे सुरू असली तरी नदीच्या किनाऱ्यावरील शेतजमिनीमध्ये शेतकऱ्यांनी शक्यतो दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शहरासह ग्रामीण भागातील लहान-मोठ्या नद्या, ओढे-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने तालुक्यातील जगबुडी व नारिंगी या दोन प्रमुख नद्यांनी रौद्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. आज सकाळी ८ वाजता जगबुडी नदीने ८.५० मिटरची पातळी गाठली होती.

त्यानंतर जलस्तर वेगाने वाढला असून, सकाळी नऊ वाजता जगबुडी नदीने ९ मिटरची पाणीपातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यावर मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकदेखील धिम्या गतीने सुरू आहे.

खेडमधील शाळांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील अनेक शाळांना सुट्टी दिली आहे. खेड-दापोली मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे खेड-दापोली एसटी बससेवा बंद ठेवली आहे, तर खेड-तुळशी मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बस बंद ठेवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT