कोकण

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

CD

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन;
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरीः शहरातील आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अजित प्रभाकर नाचणकर (वय ४६) व रोहित शशिकांत बोरकर (३१) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. १७) रात्री सव्वा नऊच्या सुमारास पालिकेचे गाळे असलेल्या इमारतीच्या मागे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत होते. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
---------
केळ्ये येथे गावठी दारु विक्रीवर धाड
रत्नागिरीः शहराजवळील केळ्ये-पवारवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची १८ लिटर दारु विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आदित्य अनंत नाखरेकर (वय ३३) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी एकच्या सुमारास केळ्ये-पवारवाडी येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केळ्ये-पवारवाडी येथे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती त्याआधारे पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी ९५० रुपयांची १८ लिटर दारु जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
--------
आगवे येथील महिलेला सर्पदंश
रत्नागिरीः आगवे (ता. लांजा) येथील शेतकरी महिलेला सर्पदंश झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. स्नेहल संतोष जोशी (वय ३५, रा. आगवे-जोशीवाडी, लांजा) असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला सकाळी शेतात जात असताना सर्पदंश झाला. तत्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी चांदेराई येथे दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
-----
सोमेश्वरमधील हल्लाप्रकरणी
संशयितांना पोलिस कोठडी
रत्नागिरीः राजकीय वादातून सोमेश्वर येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयितांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अक्षय प्रकाश मयेकर, प्रथमेश सुभाष बिडू, सुरज प्रकाश मयेकर, निलेश अनंत मयेकर, आशिष अनंत मयेकर, स्मितेश बोरकर, सूरज नांदिवडेकर अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १० जुलै २०२३ दुपारी अकराच्या सुमारास घडली होती. २००९ ला रवींद्र उर्फ रवी मयेकर या तरुणाची हत्या केली होती. या हत्येचा वाद पुन्हा सोमेश्वर गावात उफाळून आला आहे. हत्येमध्ये शिक्षा झाल्याच्या रागातून रविवारी रुपेश मयेकरसह तिघांनी हत्या झालेल्या रवी मयेकर यांच्या पुतण्याला मारहाण केली होती. सोमवारी दुपारी विरोधी गटातील संशयितांनी सात जणांनी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
-------
गोळपला हातभट्टीवर कारवाई
पावसः रत्नागिरी तालुक्यातील गोळप-हनुमानवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या महिलेविरुद्ध पूर्णगड सागरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. १८ जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास गोळप-हनुमानवाडी येथे कस्तुरी मयूर पडवळ (वय ४५) या बेकायदेशीरपणे या परिसरामध्ये हातभट्टीची दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर येथे छापा टाकून ५५० रुपयाची दहा लिटर गावठी दारू व इतर साहित्य ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
----------
दुचाकीच्या डिक्कतून मोबाईलची चोरी
खेडः शहरातील डाकबंगला शिशप्लाझा बिल्डींगच्या पार्कींगमधील छोट्या गेटसमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने मोबाईलची चोरी केली. खेड पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ जूनला सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. फिर्यादी यांनी पार्क केलेल्या दुचाकीची सीट डाव्या बाजूने वर उचलून डिक्कीमध्ये हात घालून डिक्कीत ठेवलेला १० हजार रुपयाचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी यांनी खेड पोलिसात तक्रार दिली.
-------
तीनबत्तीनाका येथे जुगार अड्यावर कारवाई
खेड ः शहरातील तीनबत्तीनाका येथील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून साहित्यासह ५ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयिताविरुद्ध खेड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शेखर श्रीधर जाधव (वय ३८, रा.चिंचघर प्रभूवाडी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.१८) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा लोकांकडून पैसे स्विकारुन विनापरवाना मटका जुगाराचा खेळ चालवत असताना सापडला. त्याच्याकडून साहित्यासह ५ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT