कोकण

सावर्डे ः पशुसंवर्धन विभागाचा कारभार हाकताना अडचणी

CD

पशुसंवर्धन विभागाच्या कारभारात अडचणी

कर्मचारी कमी, रिक्त पदांचा ताण; दरमहा जातो अहवाल

संदीप घाग ः सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २६ ः चिपळूण पंचायत समितीअंतर्गत पशुधन विकास अधिकारीपद (विस्तार अधिकारी) अनेक वर्षे रिक्त आहे. येथील रहाटगाडा पशुधन पर्यवेक्षक व्ही. एस. बारापत्रे अनेक वर्षे हाकत आहेत तर पंचायत समितीचे साहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. एन. अहिरे कार्यालयीन कारभाराबरोबरच कापरे, नांदगाव, तुंरबव या तीन गावांतील पशुधन पर्यवेक्षकपदाचा प्रभारी कारभार करताहेत तर तालुका कार्यालयात पशुधन विकास अधिकारी, ३ पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामीण दवाखान्यात तीन पशुधन पर्यवेक्षक अशा जागा रिक्तच असून तालुक्यात ३ परिचर पद रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेंतर्गत चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागात आठ पशुवैद्यकीय दवाखाने असून, यामध्ये रामपूर, सावर्डे हे श्रेणी एकचे दोन पशुवैद्यकीय दवाखाने तर कापरे, नांदगाव कळकवणे, कुंभार्ली, वहाळ, तुरंबव हे श्रेणी दोनचे सहा पशुवैद्यकीय दवाखाने तालुक्यात आहेत. या आठ दवाखान्यात ५९ गावांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोनचे सहा दवाखान्यांपैकी कापरे, नांदगाव, तुंरबव येथील पशुधनपर्यवेक्षकाची तीन पदे रिक्तच असल्याने या ठिकाणी अधिकाऱ्यांना अतिकार्यभार सोपवून प्रभारी पदभार दिला गेला आहे. राज्य शासनाकडून पशुसंवर्धन विभागात अनेक वर्षे कर्मचारी भरती झाली नसल्याने चिपळूण तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाची कर्मचाऱ्यांविना कारभार करताना त्रेधातिरपिट उडाली आहे. कागदोपत्री या कार्यालयाचा कारभार व्ही. एस. बारापात्रे यांच्याकडे आहे. उर्वरित साहाय्यक पशुधन विकास अधिकारी व्ही. टी. लोकरे यांना कुंभार्ली, कळकवणे येथील पशुपर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. वरिष्ठ साहाय्यक एम. एस. साळवी यांना चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कामगिरीवर पाठवण्यात आले. परिचर व्ही. डी. जाधव चिपळूण पशुसंवर्धन विभागात आहेत.

चौकट
सघन कुक्कुट विकास गट ठप्प
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे सघन कुक्कुट विकास गट चिपळूण नावाने राज्यस्तरावरील चिपळूण पंचायत समिती अखत्यारित संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत होती. या ठिकाणी २ हजार अंडी उत्पादित करणारे पक्षी होते; मात्र २०२१ पासून शासनाकडून निधी न मिळाल्याने संस्थेस कुलूप लागले आहे. अंडी देणारे पक्षी येथे ठेवले जात होते. येथील अंडी व पक्षी शेतकऱ्यांना पैदास करण्यासाठी वितरित करण्यात येत होते. या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी, साहाय्यक पशुधन विकास अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, तीन परिचर, एक रात्र पहारेकरी असे कर्मचारी होते; मात्र निधी बंद झाल्याने सर्व ठप्प झाले.

कोट
चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात जिल्हा परिषदेंतर्गत ९ संस्था असून, १ बंद आहे. कर्मचारी कमी असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर सेवा देण्यास त्रास, अडचणी येत आहेत. दर महिन्याला शासनाला रिक्त पदाचा अहवाल दिला जातो.
- व्ही. एस. बारापात्रे, प्रभारी विस्तार अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT