कोकण

-काजू लागवड केली, संरक्षणाकडे दुर्लक्ष

CD

३३ (पान ५ साठी)


-rat२५p२६.jpg-
२३M१८८०८
पावस ः मावळंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या बाजूने लावलेल्या काजू रोपांना कोणतेही संरक्षण दिलेले नाही.
------------

काजू रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष

वनविभागाकडून मावळंगेत वृक्षारोपण ; किती झाडे जगणार हा प्रश्न

पावस, ता. २६ ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रत्नागिरी वनविभागाने रस्त्याच्या बाजूने काजू रोपांची लागवड केली आहे. मात्र रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेली रोपांच्या संवर्धनाबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात. मात्र त्यांच्या संवर्धनाबाबत काळजी घेतली जात नसल्याचे पुढे येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राज्य मार्गावरील रस्त्याच्या बाजूला वन विभागाने काजूची रोपे लावली आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतामध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. मात्र त्या रोपांच्या बाजूला संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे यातील किती झाडे जगणार असा प्रश्न पुढे येत आहे.
या संदर्भात ग्रामस्थ अनिल बिरजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वनविभागाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या चला झाडे लावू या कार्यक्रमांतर्गत काजूची रोपे रस्त्याच्या बाजूने लावली आहे. ही झाडे लावून त्याने शासनाला आम्ही झाडे लावली आहेत हे दाखवून दिले आहे. मात्र ती जगवायची कुणी आणि कशी यावर उपाययोजना केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT