कोकण

भुईमूग बीजप्रक्रिया

CD

18999
डॉ. विलास सावंत


भुईमूग बीजप्रक्रिया

लीड
पोषणयुक्त आहाराच्या दृष्टीने भुईमूग हे निसर्गाने दिलेले वरदान आहे. भारतात दरवर्षी खाद्यतेलाच्या एकूण गरजेच्या अंदाजे ५० टक्के गरज आयात केलेल्या तेलापासून भागवली जाते. तेलबियांच्या उत्पादनात आपला देश स्वयंपूर्ण व्हावा, या दृष्टीने भुईमुगाची लागवड सुधारीत पद्धतीने होणे गरजेचे आहे.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस
...................
भुईमूग हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. महाराष्ट्रात भुईमुगाची उत्पादकता सरासरी १६ ते १८ क्विंटल प्रतिहेक्टर आहे. भुईमुगाच्या शेंगांपासून खाद्यतेल व पेंड मिळते. जनावरांना चारा मिळतो. हे द्विदल पीक असल्याने जमिनीची उत्पादकता वाढवते. भुईमुगामध्ये २६ टक्के प्रथिने, ४८ टक्के तेल, ३ टक्के तंतुमय पदार्थ असतात. प्रोटीन, कार्बोदके व कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. कोकणात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत भुईमुगाची लागवड केली जाते. पेरणीपूर्वी ८ ते १० दिवस शेंगा फोडून बियाणे पेरणीस तयार करावे. फुटके, किडके, साल निघालेले व बारीक बियाणे निवडून वेगळे करावे. पेरणीसाठी केवळ टपोरे बियाणे वापरावे. पेरणीकरिता उपट्या वाणासाठी १०० किलो, मोठ्या दाण्याच्या वाणासाठी १२५ किलो बियाणे वापरावे. निमपासऱ्या व पसऱ्या वाणासाठी हेक्टरी ८० ते ८५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण चाचणी करणे महत्त्वाचे असते. बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक व स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळणे याला ‘बीजप्रक्रिया’ असे म्हणतात. भुईमुगाच्या बियांना बुरशी लवकर लागते. १ किलो बियांसाठी ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम बाविस्ठीन हे बुरशीनाशक चोळावे. बीजप्रक्रियेनंतर १ किलो बियाण्यास ५ ग्रॅम रायझोबियन व पीएसबी ही जीवाणूसंवर्धक हलक्या हाताने चोळून सावलीत वाळवावे. असे बीजप्रक्रिया केलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे. जीवाणूंचे द्रावण करण्यासाठी १ लिटर पाण्यामध्ये १२५ ग्रॅम गुळ घालून त्याची गुळवणी तयार करावी. त्यानंतर पोत्यावर पसरविलेल्या बियाण्यावर एकसारखा थर बसेल, अशा तऱ्हेने हे मिश्रण हळुवारपणे बियाण्यास चोळावे व सावलीत सुकवून पेरणी करावी. जीवाणूंमुळे जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण झाल्यामुळे भुईमुगाच्या उत्पादनामध्ये १० ते २३ टक्के वाढ होते. रासायनिक खताची बचत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT