कोकण

योगाद्वारे स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके रंगली

CD

२५ (टुडे पान २ साठी, अॅंकर)


-rat२४p२४.jpg-
२३M१८४३२
रत्नागिरी : राष्ट्रसेविका समिती व रेणुका प्रतिष्ठानतर्फे योगाद्वारे स्वसंरक्षण कार्यक्रम सादर करताना सेविका पहिल्या छायाचित्रात. दुसऱ्या छायाचित्रात सूर्यनमस्कार घालताना सेविका.
-----------

योगाद्वारे महिला स्वसंरक्षणाचे धडे

राष्ट्र सेविका समिती ; रेणुका प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम

रत्नागिरी, ता. २६ : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आगळावेगळा कार्यक्रम रविवारी माधवराव मुळ्ये भवनात रंगला. पाच महिलांनी स्वसंरक्षण व महिलाशक्तीचे प्रतिक योगा या विषयावर सुरेख नृत्य व नियोजनबद्ध सादरीकरण केले. लोकमान्य टिळक जयंतीदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दंड, तलवार, यष्टी, छुरिका या सर्व शस्त्रांचे प्रशिक्षण समितीमध्ये मिळते. त्याचे मूळ प्रकार व नृत्य रूपात सादरीकरण झाले. सूर्य नमस्कार, प्राणायाम, विविध योगासने याचा समिती शारीरिक जोशपूर्ण करताना तसेच एकेका स्थितीत स्थिर राहताना कसा उपयोग होतो, हे प्रात्यक्षिकांतून दाखवले.
एर्नाकुलम् येथे चिन्मयानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन संस्थेतर्फे आयोजित योगा- भारताची संस्कृती या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोकण प्रांतातील पाच सेविका आर्या केळकर, तन्वी परांजपे, जुई डिंगणकर, हर्षदा कुलकर्णी आणि सिद्धी कोळेकर या एर्नाकुलम (केरळ) येथे गेल्या होत्या. त्यांनी स्वसंरक्षण व महिलाशक्तीचे प्रतिक योगा या विषयावर त्यांनी सादरीकरण केले होते. त्याचे पुन्हा येथे सादरीकरण केले. यामध्ये समितीच्या शारिरीकच्या विविध विषयांची योगविषयक आधारीत प्रात्यक्षिके झाली. सिद्धी कोळेकरने निवेदन केले.
रत्नागिरी शहर कार्यवाहिका शमिका गद्रे यांनी विष्णूमय जग हा श्लोक म्हणून कार्यक्रमाची सुरवात केली. रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विद्या पटवर्धन यांनी डॉ. रंजना केतकर यांचे कौतुक केले. रेणुका प्रतिष्ठानच्या सचिव अॅड. मानसी डिंगणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रंजना केतकर यांनी कार्यक्रमासंबंधी व तयारी, नृत्यप्रकार याविषयी माहिती दिली. या वेळी प्रा. डॉ. मंगल पटवर्धन, डॉ. कल्पना आठल्ये, प्रतिभा प्रभुदेसाई, वृंदा मुसळे, विद्या पटवर्धन, उमा दांडेकर या मान्यवरांच्या हस्ते केरळ टीमच्या सेविका व मार्गदर्शिकांचे कौतुक करण्यात आले. आर्या केळकरने प्रवास, तेथील मान्यवर डीन, व्यवस्थेतील सर्वांचे कसे सहकार्य झाले. प्रेक्षकांनी भेटून कौतुक केले याबद्दल माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT