कोकण

वेंगुर्लेत ''निराधार''ची 32 प्रकरणे मंजूर

CD

संक्षिप्त
......................

वेंगुर्लेत ‘निराधार’ची
३२ प्रकरणे मंजूर
वेंगुर्ले ः तालुका संजय गांधी निराधार समितीची त्रैमासिक सभा नुकतीच तहसीलदार कार्यालयात समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेची २४ व श्रावणबाळ योजनेची ८ अशी एकूण ३२ प्रकरणे ठेवली होती. ही सर्व प्रकरणे मंजूर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली. यावेळी समिती सचिव तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार सुवर्णा केळकर, गटविकास अधिकारी पूनम राणे, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, अशासकीय सदस्य प्रशांत नवार, साईप्रसाद नाईक, मनोज उगवेकर, श्रद्धा गोरे, अनंत केळुसकर, रामकृष्ण सावंत, सुनील घाग आदी उपस्थित होते.

‘पेजे’तर्फे एकरकमी
परतावा योजना
तळेरे : जिल्ह्यातील राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ) यांच्यामार्फत कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थींसाठी महामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या मुदती कर्ज, बीज भांडवल कर्ज, स्वर्णिमा कर्ज, मार्जिनी मनी कर्ज या सर्व योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. संबंधित कर्ज खातेधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT