कोकण

खचलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी मनसेकडून झेंडे

CD

ratchl262.jpg
M19041
चिपळूणः खचलेल्या ठिकाणी ठेवलेले बॅरेल, सोबत मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते.


कुंभार्ली घाटात रस्ता खचला
सुरक्षेसाठी मनसेकडून झेंडे ; सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष
चिपळूण, ता. २६ः कोट्यवधीचा निधी खर्च केल्यानंतरही कुंभार्ली घाटातील रस्ता काही ठिकाणी खचला आहे. येथे बांधकाम विभागाने रिकामे बॅरल ठेवून सुचना देण्याचा केविलवाणी प्रयत्न केला आहे. मात्र खचलेल्या ठिकाणी मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दगडाने भरलेले बॅलर, झेंडे आणि पट्टे लावून प्रवाशांना सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. कोट्यवधीचा निधी खर्च करून घाटातील भाग खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक देण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष खेतले यांनी दिला आहे.
दोन गाड्या जर एकमेकांना घासून गेल्या तर तुटलेल्या रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. खाली हजारो फूट खोल दरी आहे. अशावेळी काही दिवसांपूर्वी फक्त रिकामे बॅलर ठेवण्यात आले होते. प्रवासी आणि वाहनधारकांच्या तक्रारीनुसार, मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि पदाधिकारी यांनी जाऊन घाटातील रस्त्याची पाहणी केली आणि धक्कादायक वास्तव्य समोर आले. तत्काळ वाहतूक संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, खेर्डी शाखाध्यक्ष प्रशांत हटकर, संजय वाजे, आशिष गजमल, विकास म्हादम, कल्पेश म्हादम, नरेंद्र म्हादम, आदित्य तांबिटकर, निरंजय म्हादम, प्रतीक आंग्रे आदींनी दगडाने भरलेले बॅरेल, मनसेचे झेंडे आणि पट्टा लावून धोकादायक ठिकाणी वाहनचालकांना सावधानतेने गाडी चालवण्याचे सूचित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT