कोकण

संक्षिप्त

CD

पान ५ साठी

१९०२९
सैनिक स्कूल जामगे येथे
कारगिल विजय दिन साजरा
खेड ः शिवतेज आरोग्यसेवा संस्था, खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगेमध्ये कारगील विजयदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. सुरुवातीला प्रशालेचे कमांडर श्रीकृष्णन् यांनी कारगिल युद्ध, त्याची पार्श्वभूमी व युद्धामध्ये भारतीय सैन्याने गाजवलेले असामान्य शौर्य याविषयी माहिती दिली. त्यानंतर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या युद्धभूमीवरील जीवन यावर आधारित नाट्य सादर केले. हे नाट्य सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशालेचे सांस्कृतिक विभागाचे नगारे, कांबळे व एनसीसी विभागाचे सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी संस्था पदाधिकारी प्रशालेचे कमांडर श्रीकृष्णन्, प्राचार्य खोत एम. एस., सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

१९०५८
पावसमध्ये ८० टक्के भातलावणी पूर्णत्वास
पावस ः पावसमध्ये वादळी पावसाने चांगला दणका दिला असून, भातशेतीला पोषक वातावरण आहे. सुमारे ८० टक्के भातलावणी पूर्ण झाल्या आहेत. पावस परिसरात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकरी हवालदार झाले होते. त्यानंतर पावसाने आपला दिवसभराचा समतोल राखत कमी-जास्त प्रमाणात आपली हजेरी लावत होता. त्यामुळे आतापर्यंत काही किरकोळ बघता वादळी पावसाचा कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे परिसरामध्ये जगजीवन सुरळीतपणे सुरू आहे. कोणतीही वित्तहानी विशेषकरून झालेली नसल्याने जिल्ह्यातील इतर घटनांचा आलेख पाहता या भागात परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. दिवसभराच्या आपल्या कामाचा समतोल राखत पावसाचे पडण्याचे व उघडीप करण्याचे काम सुरू आहे. या अशा प्रकारे पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीच्या कामाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी आपल्या भातलावणीच्या कामांमध्ये मग्न झालेला आहे. काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे आज परिसरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. आज सकाळपर्यंत परिसरामध्ये ५८ मिलिमीटर पाऊस पडला अशा तऱ्हेने पावसाचे प्रमाण सरासरीमध्ये राहिल्यास भातलावणी अंतिम टप्प्यात येऊ शकते. या पावस मंडल कार्याअंतर्गत ४४ गावांमध्ये १८० हेक्टरमध्ये भातपेरण्या करून ८०० हेक्टरमध्ये भातलावणी केली जाते.

शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व सेवा
चिपळूण ः पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी एकाच छताखाली सर्व सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. जिल्ह्यात अशी ५४ केंद्र असून त्यामध्ये चिपळूणात ११ केंद्र सुरू होणार आहेत. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे आता ''वन स्टॉप शॉप'' मध्ये रूपांतर होणार आहे. या योजनेचे राजस्थान येथे उद्या २७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी ८.५ करोड पीएम किसान लाभार्थी यांना १४ व्या हप्त्याचे हस्तांतरण होणार असून, या वेळी २७ जुलैला सकाळी ११ वा. ते शेतकर्‍यांशी सुसंवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम जवळील कृषी केंद्रावर लावलेल्या टीव्हीवरसुद्धा शेतकरी बघू शकणार आहे. देशभरात अशी २ लाख ८ हजार केंद्र सुरू करण्यात येत आहेत. संबंधित कार्यक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी गावातील भाजपा मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख यांच्याशी शेतकरी संपर्क साधू शकतात. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण भाजपतर्फे आले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते
राजस्थानला सन्मान संमेलन
लांजा ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर व केंद्रीय रसायने आणि खते, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डाॕ. मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत उद्या (ता. २७) राजस्थानमधील सिकर येथे सन्मान संमेलनाचे उद्‍घाटन करणार आहेत. या वेळी पी. एम. किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १४व्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्येही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. भाट्ये नारळ संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र लांजा व कृषी विद्यापिठामध्येदेखील हा कार्यक्रम उद्या सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाच्या कार्यक्रमात पी. एम. किसान अंतर्गत पात्र लाभार्थींना १४व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी https://pmevents.ncog.gov.in ही वेबकास्ट लिंक आहे. तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोबाईल वरून ऑनलाइन सहभागी व्हावे, असे आवाहन प्र. उपआयुक्त (कृषी गणना) तथा पथकप्रमुख पी. एम. किसान विठ्ठल कर्डिले यांनी केले आहे.

१९०९३
प्रशासक प्रसाद शिंगटे यांना पदोन्नत्ती
चिपळूण ः येथील पालिकेचे अभ्यासू मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रसाद शिंगटे यांना पदोन्नत्ती मिळाली आहे. राज्य सरकारने त्यांची अ वर्ग पालिकेच्या मुख्याधिकारीपद पदोन्नत्ती दिली आहे. आता ते वर्ग एकचे अधिकारी म्हणून चिपळूण पालिकेत मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. खेड नगरपालिकेतून शिंगटे यांची चिपळूण पालिकेत दोन वर्षापूर्वी प्रशासकीय बदली झाली होती. जुलै २०२१ च्या महापुरानंतरच्या कालावधीत शहरातील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी चांगले योगदान दिले. शहरात पालिकेचे सफाई कामगारांसह विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छतामोहिमेवर जोर दिला होता. शहरातील विविध विभागातील चौक सुशोभित करून शहराला झळाळी देण्याचा प्रयत्न केला. कचरा प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात सुधारणा सुरू ठेवल्या आहेत. वाशिष्ठी नदीतील गाळ निघण्यासाठी त्यांनी पालिकेच्या माध्यमातून चांगले योगदान दिले. त्यामुळे वर्ग एकचे मुख्याधिकारी म्हणून त्यांना पदोन्नत्ती मिळताच शहरवासीयांनी त्यांचे अभिनंदन केले. काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत अभिनंदन करून पुढील कामकाजास शुभेच्छा दिल्या. या वेळी शहराध्यक्ष लियाकत शाह, उपाध्यक्ष राकेश दाते, माजी नगरसेवक कबीर काद्री आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT