कोकण

हरचेरी-बौद्धवाडीत डोंगराला भेगा, घरांनाही तडे

CD

rat२६p५३.jpg
M१९०७६
रत्नागिरी - डोंगराला भेगा गेल्याने हरचिरी-बौद्धवाडी येथील घराला तडे गेले आहेत.

rat२६p५४.jpg-
M१९०७७
डोंगराच्या पायथ्याशी असलेली घरे.
------------
हरचेरी-बौद्धवाडीत डोंगराला भेगा
काही घरांनाही तडे पडल्याने ग्रामस्थ भितीच्या छायेत; पुनर्वसनाची प्रतीक्षा
रत्नागिरी, ता. २७ः तालुक्यातील हरचेरी-बौद्धवाडी येथे असणाऱ्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. काही घरांनाही तडे गेल्याने संपूर्ण वाडी भितीच्या छायेखाली आहे. तीन वर्षांपासून डोंगराला भेगा पडत असून, तेथील रहिवाशांना प्रशासनाने स्थलांतरांच्या नोटिसा दिल्या आहेत. पाऊस सुरू झाला की, प्रशासनाला आठवण होते. त्यानंतर मात्र प्रशासनाला आमचा विसर पडतो. पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने गेल्या तीन वर्षांत कोणतीही हालचाल नाही. आधीच येऊन उपाय करायचे, आता आम्ही कुठे जायचे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी व्यक्त केली.
बौद्धवाडी येथे डोंगराला भेगा गेल्यामुळे पावसाळ्यात वाडी भितीच्या छायेखाली असते. गेल्या तीन वर्षापासूनची ही परिस्थिती आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासन त्यांना स्थलांतरितेच्या नोटीस देते; परंतु त्यांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने कोणत्याही हालचाली प्रशासनाकडून होत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
रायगड इर्शालवाडी येथील भीषण घटनेमुळे वाडीतील ग्रामस्थांमध्ये आणखी भितीचे वातावरण आहे. त्याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी ग्रामस्थांचा आटापिटा आहे; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद प्रशासनाकडून मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. प्रशासन अशी घटना घडण्याचे वाट बघत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कोकणात सध्या पावसाला जोर असून, अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील काही घरांना तडेदेखील गेले आहेत. स्मशानभूमीची जागा ३ फूट खचली असल्याची ग्रामस्थ सांगतात आहेत. तेथील ग्रामस्थांचा प्रशासनाने विचार करून न्याय मिळवून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.३ ते ५ वर्षे झाली डोंगराला भेगा पडल्या आहेत. येथे दहा ते बारा घरे आहेत. ग्रामस्थांमध्ये प्रचंड भिती आहे. प्रशासनाने शासकीय योजनेतून घरकुले उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.

कोट
हरचिरीमध्ये जाऊन मी पाहणी केली. बौद्धवाडीतील लोकांशी संवाद साधला. डोंगराला भेगा गेल्याने आम्ही संबंधितांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे.
- राजाराम म्हात्रे, तहसीलदार, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Price Hike : चहा महागला! युद्धाचा फटका थेट चहावर; प्रति कप ₹1 दरवाढ

IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये अंबप रोडवर भीषण आग; शेती आणि झाडांना मोठा फटका

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT