कोकण

बस फेर्‍या महाविद्यालयापर्यंत न्या

CD

19157
देवगड ः आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांना युवा सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

महाविद्यालयापर्यंत बसफेऱ्या
आवश्‍यक ः ठाकरे युवासेना

देवगड आगार व्यवस्थापकांना निवेदन

देवगड, ता. २६ ः येथील आगाराच्या तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या वस्तीच्या बसफेऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सकाळच्यावेळी महाविद्यालयापर्यंत न्याव्यात, अशी मागणी ठाकरे गट युवासेनेतर्फे करण्यात आली. आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांना तसे निवेदन दिले.
एसटी फेऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने ठाकरे गट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरिद काझी, नगरसेवक संतोष तारी, प्रवीण कावले, महेंद्र भुजबळ, तुषार धुरी, उदय करगुंटकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, येथील आगारातून तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या बहुतांशी वस्तीच्या फेऱ्या व अन्य फेऱ्यांमधून येथील स. ह. केळकर महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय नाका या ठिकाणी बसमधून उतरविण्यात येते; परंतु वेळेअभावी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोचण्यास उशीर होतो. पर्यायाने विद्यार्थ्यांना नाहक पायी जावे लागते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या ग्रामीण भागातील वस्तीच्या सर्व बसफेऱ्या व्हाया महाविद्यालय अशा आगारात याव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यांची महाविद्यालयापर्यंत जाण्याची सोय होईल. विजयदुर्ग आगारातून सुटणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थी फेऱ्याही व्हाया महाविद्यालय होऊन याव्यात. तसेच सायंकाळच्या वेळी परतीच्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवासी फेऱ्या वेळेत सोडाव्यात, अशी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT