कोकण

श्री क्षेत्र मार्लेश्वर रस्त्याची दुरवस्था

CD

१४ (टुडे पान ३ साठी, अॅंकर)


- rat३१p८.jpg, rat३१p९.jpg-
२३M२०१२१, २३M२०१२२
साडवली ः मार्लेश्वर रस्त्याची झालेली दुरवस्था.
--------
श्री क्षेत्र मार्लेश्वर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था

क दर्जाचे पर्यटनस्थळ ; पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांचेही हाल

साडवली, ता. ३१ ः संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्घ असणारे श्री क्षेत्र मार्लेश्वर हे ठिकाण आता श्रावणात भाविकांच्या आगमनाने गजबजून जाणार आहे; मात्र या ठिकाणी येण्यासाठी रस्ताच सुस्थितीत नाही. देवरूख ते आंगवली मठ हा रस्ता चांगला आहे; मात्र मठापासून मार्लेश्वर रस्ता खड्डेमय झाला आहे. भाविकांना याच खडतर मार्गाने यावे लागणार आहे.
मार्लेश्वर हे क दर्जाचे हे ठिकाण असूनही सुविधांची वानवा आहे. आमदार, खासदार यांच्याकडे कागदावर प्लॅन तयार आहे; मात्र वास्तवात भाविकांना खड्डेच दिसत आहेत. निवडणुकीला पहिला नारळ मार्लेश्वरचरणी अर्पण केला जातो, नंतर पाठ फिरवली जाते. खरेतर, मारळ ग्रामपंचायत व देवस्थानने यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. येणाऱ्‍या भाविकांकडून कर मिळतो, देणगी मिळते याचा विनियोग सोईसुविधांसाठी करायला हवा तो होताना दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्रातून जे भाविक येतात तोही मार्ग खड्डेमय आहे. बांधकाम विभाग यासाठी काही करणार आहे का, असा सवाल भाविक विचारत आहेत.
आता श्रावणातले सोमवार मार्लेश्वरला गर्दी होणार आहे. खड्डेमय मार्गाने भाविकांना यावे लागणार आहे. हा रस्ता कधी चांगला होणार हे काही सांगता येणार नाही. पर्यटन वाढले पाहिजे, असे फक्त बोलले जाते; मात्र सोयीसुविधा यांची कोणी दखल घेत नाही, हे विशेष आहे. कागदावरच्या योजना प्रत्यक्षात कधी साकार होणार, हे काही सांगता येणार नाही. हा श्रावण खड्ड्यातूनच हिरवा निसर्ग अनुभवायला लागणार आहे. बांधकाम विभागाने याची पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

SCROLL FOR NEXT