कोकण

खानूमध्ये नाचणी लागवडीचे प्रात्यक्षिक

CD

१६ (टुडे पान ३ साठी)

खानूमध्ये नाचणी लागवडीचे प्रात्यक्षिक

पावस, ता. ३१ ः दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) कार्यरत विद्यार्थ्यांच्या कृषी रत्न आणि कृषीपुत्र गटांनी रत्नागिरी तालुक्यातील खानु गावात जयश्री सुतार यांच्या शेतावर नाचणी लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले. सुतार यांच्या दोन गुंठे प्रक्षेत्रावर नाचणीच्या गावठी वाणाची रोपे ठोंबा पद्धतीने लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना लागवडीचे अंतर, खत व्यवस्थापन तसेच तण नियंत्रण याविषयी शास्त्रोक्त माहिती दिली.
कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी खानू गावात दाखल झाले आहेत. पुढील १८ आठवडे हे विद्यार्थी खानू गावात राहून शेती आणि त्यासंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके आयोजित करणार आहेत. त्याचबरोबर विविध विस्तार शिक्षण पद्धतींचा वापर करून तंत्रज्ञान प्रसाराचे काम करणार आहेत. या प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी संपर्क शेतकरी संदीप कांबळे आणि ग्रामस्थ अविनाश कुलकर्णी यांनी मदत केली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमांचे सर्वांनीच कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ. आनंद हणमंते, कार्यक्रमाधिकारी डॉ.सुदेश चव्हाण, विषय विशेषज्ञ डॉ.विरेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक पुष्कर कुलकर्णी यांनी, तर कौशिक पाल याने आभार मानले. प्रात्यक्षिकासाठी खानू परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Kolhapur Wildlife Attack : अवघ्या सव्वा वर्षांच बाळ वडिलांच्या कुशीत शांत झोपलं अन् कोल्ह्याने बरोबर हेरलं; कोल्हापूरच्या चंदगडमध्ये घडलं भयानक

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

SCROLL FOR NEXT