कोकण

-वानर, माकडांच्या उपद्रवाकडे शासनाचे दुर्लक्ष

CD

४ (टुडे पान १ साठी, अॅंकर)


वानर, माकडांच्या उपद्रवाकडे शासनाचे दुर्लक्ष

अविनाश काळे ; अभ्यास समितीच्या अहवालाकडे डोळेझाक

पावस, ता. ३१ ः वानर, माकडे यांची संख्या प्रचंड वाढल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्‍यांना वानर, माकडांचा प्रचंड उपद्रव होत आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे याबाबत न्याय मिळण्यासाठी लवकरच वानर, माकडांच्या त्रासाने त्रस्त लोकांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी सांगितले.
शेतकरी आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासामुळे उद्विग्न झाला आहे. नको ती शेती बागायती आणि गावात राहणे इतक्या मनःस्थितीमध्ये शेतकरी पोचला आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी व्यक्त केले. या प्रश्नाचे गांभीर्य सरकारला कळावे म्हणून २ डिसेंबर २०२२ ला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनात आमदार योगेश कदम, शेखर निकम, भास्कर जाधव, नितेश राणे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे चर्चा घडवून आणली. त्यानंतर शासनाने अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. त्या समितीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल देण्यासाठी उपसमिती नेमली. त्या समितीला माझ्यासह अनेक शेतकऱ्यांनी लेखी तोंडी निवेदन दिले होते. त्या समितीचा अहवाल येऊन दोन महिने झाले. त्यात वानर, माकड यांची संख्या वाढली आहे. शेतकऱ्‍यांना नुकसान भरपाई नको, कायमचा बंदोबस्त हवा. प्रचंड त्रास होत आहे, अशी निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याचबरोबर संख्या प्रचंड वाढली आहे. हिमाचल प्रदेश धर्तीवर नसबंदी किंवा अभयारण्यात सोडणे. कायम बंदोबस्ताबाबत शिफारशी केल्या आहेत; मात्र या समिती अहवालाबाबत कोणताही विचार झालेला दिसत नाही.
नुकसानभरपाई हा विषय आकस्मिक गोष्टींसाठी असतो. रोज होणाऱ्‍या त्रासासाठी नुकसानभरपाई नसते. तिथे कायमचा बंदोबस्त करायला लागतो. हे सरकारला कळू नये काय? वाघ रोज माणसांना खायला लागला तर शासन रोज २५ लाख भरपाई देणार नाही. नरभक्षक म्हणून वाघाला गोळी घातली जाईल. त्याच धर्तीवर रोज होणाऱ्‍या वानर, माकडांच्या तपासाबाबत कायमचा बंदोबस्त हवा. भयमुक्त आणि सुरक्षित शेती करण्याचा अधिकार शेतकऱ्‍यांना हवा, असे परखड मत काळे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 11th admission online: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाइन नोंदणीला शुक्रवारपासून प्रारंभ; दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध

Parth Pawar look ajit pawar : पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेतली पण, त्यांचा लूक पाहिला का? अजित दादांची येईल आठवण

Baramati News: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे का घेतला? हर्षवर्धन सपकाळांनी खरं कारण सांगितलं; आतली बातमी आली समोर

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

SCROLL FOR NEXT