कोकण

पाककला स्पर्धेस मालवणात प्रतिसाद

CD

टीपः swt३१२३.jpg मध्ये फोटो आहे.

मालवण ः पौष्टिक आहार पाककला स्पर्धेतील विजेत्या आरती वरक यांना अभय कदम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पाककला स्पर्धेस मालवणात प्रतिसाद
आरती वरक प्रथम ः ‘रोटरी’तर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : यंदाच्या मिलेट वर्ष म्हणजेच भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या येथील रोटरी क्लबतर्फे कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी सॅफ्रॉन येथे आयोजित केलेल्या ‘पौष्टिक आहार पाककला’ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत आरती वरक (मिक्स मिलेट उतप्पा व भोपळा-गाजराची चटणी) विजेत्या ठरल्या. द्वितीय क्रमांक प्रियांका पाटणे (धपाटे व पडवळीच्या बियांची चटणी), तृतीय क्रमांक माधुरी सामंत (चवदार पौष्टिक भाजी व मिश्र पिठाचे थालीपीठ) यांनी मिळविला.
स्पर्धेचे उद्‍घाटन अन्नपूर्णेचे पूजन करून केले. प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारमाठचे उपसरपंच जीवन भोगावकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय कदम, रोटरीच्या डॉ. लीना लिमये, ऋषिकेश पेणकर, रतन पांगे, अनिल चव्हाण, अभय कवटकर, रमाकांत वाक्कर, विनय गावकर, भाऊ साळगावकर, मनोज रावले, सुविधा तिनईकर, तनिष्का कासवकर, अन्वेशा कदम, रश्मी वाक्कर, प्रणाली चव्हाण आदी उपस्थित होते.
स्पर्धेत वरी, बाजरी, ज्वारी, नाचणी यापासून बनविलेला पदार्थ, तसेच आयोजकांनी निवडून दिलेल्या भाज्यांपासून पदार्थ बनवायचा होता. यात ३० महिला स्पर्धकांनी सहभाग घेत बनविलेले विविध पदार्थ सादर केले होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. गार्गी ओरसकर व रतन पांगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. लीना लिमये यांनी केले. प्रथम विजेत्यास ११११ रुपये व रोटरी क्लबतर्फे चषक, द्वितीय क्रमांकास ९९९ रुपये व चषक, तृतीय क्रमांकास ७७७ रुपये व रोटरी क्लबतर्फे चषक अशी पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT