कोकण

दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे स्पर्धा, स्वच्छता अभियान

CD

२७ (पान २ साठी)

दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान स्पर्धा


रत्नागिरी, ता. ३१ ः दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे गुणवंत सत्कार समारंभ, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान व पावसाळी क्रिकेट स्पर्धा व अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याचा निर्णय झाला.
ही सभा वसंत पाटील यांच्या निवासस्थानी दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंगशेठ दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. सचिव दिनेश जाक्कर यांनी स्वागत केले. दर्यावर्दी प्रतिष्ठानचे संचालक संतोष पावरी यांनी विविध उदाहरणे, दाखले देऊन सभासदांमध्ये सामाजिक कार्याची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण केली. प्रतिष्ठानच्या आगामी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमासंदर्भात चर्चा केली. प्रतिष्ठानच्या नियोजित बहुउद्देशीय इमारतीसंदर्भात आराखडा समजावून सांगितला व तसे नियोजन करण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग दाभोळकर यांनी सर्व कार्यक्रमाचा आढावा घेऊन आपण हे दैवी काम समजून अविरतपणे सुरू ठेवूया, असे आवाहन केले. संचालक भगवान पाटील, वसंत पाटील, नीलेश पाटील, महिला अध्यक्षा मेघा पाटील, विकास दाभोळकर, ज्ञानेश्वर पाटील, संजय वासावे, राजकुमार आगडे, प्रशांत होडेकर, हरिश्चंद्र कोलकांड, रामा राजकुमार म्हातनाक, गणेश ढोर्लेकर, वैजयंती पटेकर, नेहा पाटील, जलपरी आगडे, जातिषा पाटील, सायली वासावे, कविता पटेकर, सत्यवती भायनाक, तृष्णा पाटील, निलिमा वासावे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT