कोकण

धनगर समाजाचा

CD

२८ (पान २ साठी)

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा

रत्नागिरी, ता. ३१ ः धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करा, अशी शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे करावी, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली आहे.
शासनाच्या विविध संशोधन संस्थांनी वेळोवेळी अभ्यास करून धनगर आणि धनगड ही एकच जात असल्याचा अहवाल दिला आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्याने धनगर समाजाला न्याय मिळालेला नाही. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर होणे आवश्यक आहे. केंद्रात भाजप सरकारला दहा वर्षे पूर्ण होतील तरी हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये नाराजी आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे राज्यातील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर एसटी आरक्षणाच्या बाबतीमध्ये निवेदन देण्यात येणार आहे. धनगर समाजामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, असे प्रवीण काकडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT