कोकण

खेड ः रासायनिक सांडपाणी सोडण्याविरूद्ध मनसे आक्रमक

CD

रासायनिक सांडपाणी
सोडण्याविरूद्ध मनसे आक्रमक
कंपनीवर कायदेशीर कारवाईची मागणी ; आंदोलनचा इशारा
खेड, ता. ३१ ः तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कारखान्यातून पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन परिसरातील एका ओढ्यात रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. या कंपनीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवले गेले असून जर या कंपनीवर कायदेशीर कारवाई झाली नाही व या कंपनी व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य चिटणीस संजय आखाडे यांनी दिला आहे.
खेडमधील लोटे एमआयडीसीमधील एका रासायनिक कारखान्यातून पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन एमआयडीसी परिसरातील एका ओढ्यात रसायनमिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे लोटे परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अॅलर्ट आहे. खेड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेऊन लोटे एमआयडीसीमधील एका रासायनिक कंपनीने हा घातक प्रकार केला असल्याचे उघड झाले असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ज्या लोटे परिसरात नैसर्गिक नाल्यात केमिकलचे रासायनिक सांडपाणी सोडले आहे तो नाला लोटे परिसरातील सोनपात्रा नदीला मिळतो. याच परिसरात अनेक गावांच्या नळपाणी योजनादेखील आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणीदेखील दूषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. लोटे एमआयडीसीमधील प्रदुषणाचा मुद्दा आता पुन्हा समोर आल्याने पर्यावरणमंत्र्यांनी तत्काळ यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Pune News: थरारक जलक्रीडांनी रंगला ‘रिगाटा महोत्सव’; पुण्यात ९८ वर्षांच्या परंपरेचा जलतिमाही उत्सव, नौकांची धमाल!

Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

SCROLL FOR NEXT