कोकण

वेगवान वार्‍यामुळे मच्छीमारांचा मुहूर्त हुकणार

CD

४८ (पान ३ साठीमेन)

-rat३१p४०.jpg-
२३M२०२३०
रत्नागिरी ः मासेमारीचा मुहूर्त साधण्यासाठी मच्छीमार समुद्राच्या लाटांवर स्वार होण्यासाठी तयार आहेत. परंतु सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मच्छीमारी नौका किनाऱ्यावरच आहेत.
--------

वेगवान वाऱ्याने मच्छीमारांचा मुहूर्त हुकणार

जिल्ह्याला यलो अलर्ट ; ९० टक्के नौका किनाऱ्यावरच

रत्नागिरी, ता. ३१ ः समुद्र किनारीपट्टीवर वेगवान वारे वाहू लागल्यामुळे आणि समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठीचा उद्याचा (ता. १) मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस वातावरण शांत असल्यामुळे मच्छीमारी समुद्रावार स्वार होण्यासाठी सज्ज झाले होते. हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात अधुनमधून सरी पडत आहेत. मात्र जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीसाठी वातावरण अनुकूल नसल्याने ९० टक्के मासेमारी नौका किनाऱ्यावरच विसावल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवस पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे मुसळधार पावसाने प्रभावित जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मासेमारी बंदी १ ऑगस्टपासून उठणार आहे. त्यामुळे मासेमारीसाठी मच्छीमारांनी तयारी केली होती. मच्छीमारांनी नौकाची कामं करून मासेमारीसाठी तयारी केली आहे. परंतु हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केल्याने सरीवर पाऊस सुरू आहे. तसेच किनाऱ्यावर वेगवान वारे असल्यामुळे मच्छीमारांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मासेमारीसाठी जाण्याचे धाडस केलेले नाही. त्यामुळे मच्छीमारांचा पहिल्याच दिवसाचा मुहूर्त हुकणार आहे.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी २१.४४ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड १०, दापोली ३२, खेड १६, गुहागर १३, चिपळूण २२, संगमेश्वर ४०, रत्नागिरी १५, लांजा २८, राजापूर १७ असा पाऊस झाला आहे. खेड, राजापूर, संगमेश्वर या तिन तालुक्यातील मध्यम पाटबंधारे प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १८२.६९ दशलक्षघनमीटर इतका आहे. तसेच पावसाचा जोर ओसरला असला तरीही जगबुडी नदी इशारा पाणीपातळीवर वाहत आहे. सध्याची पाणीपातळी ५.३० मीटर असून नदीची इशारा पातळी ५ मीटर आणि धोका पातळी ७ मीटर आहे.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT