कोकण

समुद्र किनाऱ्यालगत कृत्रिम भित्तिका

CD

१३ (टुडे २ साठी, अँकर)

समुद्र किनाऱ्यालगत कृत्रिम भित्तिका

मत्स्य विभाग ; जिल्ह्यातील २५ गावांची निवड

रत्नागिरी, ता. ११ ः माशांच्या जातींचे संरक्षण करण्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी मत्स्य विभागातर्फे या वर्षी जिल्ह्यातील २५ गावांमध्ये समुद्र किनाऱ्यालगत कृत्रिम भित्तिका उभारण्यात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या मत्स्योत्पादनाचा अभ्यास केल्यास ६५ ठळक मत्स्य जातींपैकी ३५ मत्स्य जातींचे मत्स्योत्पादन शून्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन आणि मत्स्य प्रजातींचे संरक्षण काळाची गरज असल्याचे मत्स्य विभागाचे मत आहे. त्यामुळेच यावर्षी मत्स्य विभागातर्फे जिल्ह्यात कृत्रिम भित्तीका उभारण्यात येणार आहेत. तामिळनाडू येथील सेंट्रल मरीन फिशरिज रिसर्च इन्स्टट्यूटचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जो. किझाकुडम हे रत्नागिरीत आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील दापोली, कोंड कारुळ, रत्नागिरी आणि साखरी नाटे या गावात जनजागृती करण्यासाठी बैठकाही आयोजित करण्यात आल्या होत्या, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.

कृत्रिम भित्तीका...
कृत्रिम भित्तीका मासळी एकत्रित करण्याचे एक शास्त्रोक्त अभ्यास करून निर्माण केलेले साधन आहे. हे साधन समुद्राच्या तळावरील आढळणारी वनस्पती व मासळीची उपलब्धता विकसित करण्यासाठी तसेच मासळी समूहांना एकत्रित करण्यासाठी आणि सदर मासळीची पैदास करून त्यांना घरासारखे सानिध्य निर्माण करून देतात. कृत्रिम भित्तीकांची पाखरण करण्यासाठी पाण्याची खोली, जल प्रदूषण, समुद्रकिनारा, पाण्याची पारदर्शकता, लाटांचे प्रमाण या गोष्टींचा अभ्यास केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स करणार बाहेर? दुसऱ्या मुंबईकर खेळाडूला संघात घेण्यासाठी प्रयत्न

Devendra Fadnavis : ८० कोटींचे 'मिनी मंत्रालय' सज्ज! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जिल्हा परिषद नूतन इमारतीचे उद्‌घाटन

Latest Marathi Breaking News Live : तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम आला, पण पुस्तके कधी? चौथी-सातवीच्या मार्गदर्शक पुस्तकांसाठी शिक्षक-पालक संभ्रमात

Solapur Weather Update: सोलापूर परिसरातील थंडी ओसरली; किमान तापमान वाढले, मंगळवारपर्यंत थंडी कमीच

SCROLL FOR NEXT