कोकण

कृत्रिम भित्तिकातून समुद्रात मासळीची पैदास

CD

- rat१३p३९.jpg- KOP२३M२३२०५ दापोली ः पाजपंढरीत मच्छीमारांना मार्गदर्शन करताना डॉ. जो. किझाकुडण.
---------

कृत्रिम भित्तिकातून समुद्रात मासळीची पैदास

डॉ. जो. किझाकुडण ; घटत्या उत्पादनावर पर्याय, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १३ : समुद्रातील नैसर्गिकरित्या मासळी उपलब्ध होण्याचे प्रमाण घटत आहे. मासे असतील तरच मच्छीमारी व्यवसाय टिकून राहील. दिवसेंदिवस या ना त्या कारणामुळे समुद्रातील मासळीच्या उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या कुटुंबाच्या रोजी-रोटीचा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच मासळीच्या पैदासीसाठी समुद्रात कृत्रिम भित्तिका तयार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. जो. किझाकुडण यांनी पाजपंढरी येथे केले.
सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या वतीने पाजपंढरी येथील हर्णे पाज मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभागृहात मच्छीमार व्यवसायिक बांधवांसाठी खास कृत्रिम भित्तिका उभारण्यासाठी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हर्णै, पाजपंढरी, केळशी, उटंबर, आडे, बुरोंडी, दाभोळ, ओणनवसे आदी गावातील मच्छीमार बांधवांसह शास्त्रज्ञ डॉ. जो. किझाकुडण, वैभव म्हात्रे, परवाना अधिकारी दीप्ती साळवी, हर्णै पाज मच्छीमार सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र पावसे उपस्थित होते. नैसर्गिकरित्या मासळीच्या होणाऱ्या पैदासीला विविध कारणाने मर्यादा आल्याने आता मानव निर्मित साहित्य वापरून समुद्रात स्थानिक मच्छीमारांच्या संमतीने समुद्रात कृत्रिम भित्तिका उभारणे गरजेचे झाले आहे. कृत्रिम भित्तिका म्हणजे मानवनिर्मित साहित्य समुद्रामध्ये एका विशिष्ट जागेमध्ये सोडून त्यामध्ये समुद्र प्रवाळ तयार होण्यास मदत करणे या समुद्री प्रवाळामुळे समुद्रामधील जैवविविधता, उत्पादकता वाढविण्याकरिता मदत होईल यांच्या जवळ मासळी आसऱ्याला जागा तयार होत असल्यामुळे प्रजननासाठी जागा मिळते. यामुळे मस्योत्पादन वाढण्यास मदत होते, अशी माहिती डॉ. जो. कुझाकुडण यांनी दिली.
माशांच्या जातींचे संरक्षण करण्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी मत्स्य विभागातर्फे जिल्ह्यातील २५ गावांमध्ये समुद्र किनाऱ्यालगत कृत्रिम भित्तिका उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्याला १६७ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या मत्स्योत्पादनाचा अभ्यास केल्यास ६५ ठळक मत्स्य जातींपैकी ३५ मत्स्य जातींचे मत्स्योत्पादन शून्य झाले आहे. त्यामुळे मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन आणि मत्स्य प्रजातींचे संरक्षण काळाची गरज आहे. त्यामुळे मत्स्य विभागातर्फे जिल्ह्यात कृत्रिम भित्तिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच तामिळनाडू येथील सेंट्रल मरीन फिशरिज रिसर्च इन्स्टट्यूटचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जो. किझाकुडम हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत दापोली, कोंड कारुळ, रत्नागिरी आणि साखरी नाटे येथे जनजागृती करण्यासाठी बैठकाही आयोजित करण्यात आल्या आहेत, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
-----
चौकट
काय आहे कृत्रिम भित्तिका
कृत्रिम भित्तिका मासळी एकत्रित करण्याचे एक शास्त्रोक्त अभ्यास करून निर्माण केलेले साधन आहे. हे साधन समुद्राच्या तळावरील आढळणारी वनस्पती व मासळीची उपलब्धता विकसित करण्यासाठी तसेच मासळी समुहांना एकत्रित करण्यासाठी आणि मासळीची पैदास करून त्यांना घरासारखे सानिध्य निर्माण करून देतात. कृत्रिम भित्तिकांची पाखरण करण्यासाठी पाण्याची खोली, जल प्रदूषण, समुद्रकिनारा, पाण्याची पारदर्शकता, लाटांचे प्रमाण या गोष्टींचा अभ्यास केला जातो.

---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Dharur Ghat Accidents: धारूर घाटात अपघातांची मालिका कायम; जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरुस्ती आदेशाला विलंब, नागरिकांमध्ये संताप

Malshej Ghat Project Protest: माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यासाठी मढ येथे आदिवासींचा ‘गाढव मोर्चा’ व रास्ता रोको; अदानी हटाओ, सह्याद्री बचावोच्या घोषणा

SCROLL FOR NEXT