१८ (पान २ साठी)
-rat१७p९.jpg-
२३M२३८४१
रत्नागिरी : कासारवेली प्राथमिक शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन पाहताना माजी आमदार बाळ माने, माधवी माने आदी.
------
कासारवेलीत रानभाज्यांचे प्रदर्शन
रत्नागिरी ः तालुक्यातील कासारवेली प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाची पाहणी माजी आमदार बाळासाहेब माने, दी यश फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त माधवी माने, सरपंच वेदिका बोरकर, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी केली. ग्रामीण भागांत रानभाज्या उपलब्ध होतात. याची माहिती विद्यार्थ्यांना लहानपणापासून व्हावी व या रानभाज्यांचे शास्त्रीय महत्व, पावसाळ्यात उत्तम आरोग्यासाठी या भाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना कळला पाहिजे याकरिता हे प्रदर्शन भरवण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी रानभाज्या आणल्या होत्या. यामध्ये टाकळा, काटलं, अळू, भारंगी, कुर्डू, काकई यांसह अन्य विविध भाज्या मांडल्या होत्या. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोलगे, मुख्याध्यापिका ज्योती डोंगरे यांच्यासमवेत शिक्षक शिक्षक अनिल म्हाद्ये, अनघा सावर्डेकर, साक्षी आग्रे आणि ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.