२६ (पान २ साठी)
-rat१७p३२.jpg-
२३M२३९३३
चिपळूण ः नागपंचमीसाठी मातीचे नाग तयार करताना जिद्द शाळेतील विद्यार्थी.
----------
जिद्द शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केले मातीचे नाग
चिपळूण ः जयदीप मोने उद्योग केंद्र व जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी नागपंचमीसाठी आकर्षक मातीचे नाग तयार करून विक्रीस ठेवलेले आहेत. यामध्ये फिनेल, लिक्विड सोप, राख्या, भेटकार्ड, अगरबत्ती, ऑर्गंडीची फुले, विविध प्रकारच्या फाईल जसे साधी फाईल, स्प्रिंग फाईल, बॉक्स फाईल इत्यादी उत्पादने तयार करून विक्री केली जाते. २१ ऑगस्टला नागपंचमी असल्यानिमित्ताने उद्योग केंद्रातील व शाळेतील मतिमंद मुलांनी मातीचे नाग तयार करून विक्रीस ठेवले आहेत व ते अगदी स्वस्तात स्वस्त उपलब्ध आहेत.
------------
-rat१७p२६.jpg ः
२३M२३९०३
पोफळी ः कॅरम स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करताना चंद्रकांत सुवार, भिमराव बामणे
--------
कॅरम स्पर्धेत सुजित जाधव विजेता
चिपळूण ः पोफळी येथील शिवराज मित्रमंडळ आणि मैत्री क्लबच्या संयुक्त विद्यमाने कॅरम स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला चिपळूण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १९० खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यात शालेय गटात ४० खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंगल गटात ५० तर डबल गटात २५ जोड्या सहभागी झाल्या. पोफळीचे माजी सरपंच चंद्रकांत सुवार, माजी उपसरपंच भिमराव बामणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. सिंगल गटात सुजित जाधव विजेता ठरला. डबल गटात सौरभ तांबे, दिनेश खेडेकर यांची जोडी प्रथम विजेता ठरली तसेच मुन्ना वरवडेकर, संतोष जोगळेकर, सुनील जाधव यांनाही गौरवण्यात आले. माजी सरपंच चंद्रकांत सुवार, उपसरपंच भिमराव बामणे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले. या वेळी शिवराज मित्रमंडळाचे नितीन बामणे, अभिजित करंजकर प्रवीण सावंत, केतन सुवार, प्रशांत कदम, प्रियेश मानकर, प्रशांत निंबाळकर, जितेंद्र कदम, नितेश बामणे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.