कोकण

रत्नागिरी-पालघरच्या यंगस्टरने मारली बाजी

CD

फोटो ओळी
-rat१७p२९.jpg-KOP२३M२३९३० रत्नागिरी ः राज्यस्तरीय आमंत्रितांच्या रत्नागिरी कॅरम लीग सीझन ६ मध्ये पालघरच्या यंगस्टरने बाजी मारली. आयोजकांसह यंगस्टरची टीम.


पालघरच्या यंगस्टरने मारली बाजी

रत्नागिरी कॅरम लीग ; दीड लाखाचे बक्षीस

रत्नागिरी, ता. १८ ः राज्यस्तरीय आमंत्रितांच्या रत्नागिरी कॅरम लीग सीझन ६ मध्ये पालघरच्या यंगस्टरने बाजी मारली. अंतिम फेरीत त्यांनी शिवगर्जना लायन्स संघाला अतिशय अटीतटीच्या सामन्यात २-१ अशी मात करून विजय मिळवला.

उदय सामंत फाउंडेशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑइल, इन्फिगो आयकेअर, ओएनजीसी व पितांबरी यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. यंगस्टरने पहिल्या एकेरीच्या सामन्यात विश्वविजेत्या संदीप दिवेने शिवगर्जना लायन्सच्या अहमद अली सय्यदवर २५-०, २५-५ अशी सहज मात केली; मात्र यंगस्टरच्या अमोल सावर्डेकर व सिद्धांत वाडवलकर जोडीला शिवगर्जना लायन्सच्या रियाझ अकबर अली व महम्मद घुफ्रान विरुद्ध ५-१५, १-२५ असे सहज पराभवाला सामोरे जावे लागले.

अंतिम मिश्र दुहेरीचा सामना निर्णायक...
तिसरा व अंतिम मिश्र दुहेरीचा सामना निर्णायक ठरला. या सामन्यात यंगस्टरच्या जावेद शेख, अंबिका हरिथ जोडीने शिवगर्जना लायन्सच्या प्रफुल्ल मोरे व प्राजक्ता नारायणकर जोडीला ११-१२, १७-८ व १६-१५ असे शेवटच्या बोर्डात हरवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. जैन सुप्रिमो संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT