कोकण

पाडलोस येथे रविवारी जिल्हास्तर भजन स्पर्धा

CD

पाडलोस येथे रविवारी
जिल्हास्तर भजन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ः पाडलोस गाव व्हॉट्सअप ग्रुप आयोजित श्री देव रवळनाथ मंदिर, पाडलोस येथे रविवारी (ता. २०) सायंकाळी ५ वाजता ‘राग आमचे भजन तुमचे’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यात प्रथमच अशी भजन स्पर्धा होत असून परिसरातील सर्व भजनप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर यांनी केले आहे.
स्पर्धेत श्री देवी सातेरी भजन मंडळ-सातुळी (बुवा-अमित परब), श्री गणेश भजन मंड माजगाव (बुवा-कृणाल वारंग), प्राथमिक शिक्षक कलामंच कुडाळ (राजेश गुरव), श्री सनामदेव भजन मंडळ सांगेली (खेमराज सनाम), श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ जानवली (योगेश मेस्त्री), श्री सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ तळवडे (उदय नागडे), श्री दत्त भजन मंडळ वर्दे (नरेंद्र मेस्त्री), श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ असरोंडी (विशाल सावंत), स्वरधारा भजन मंडळ तांबोळी (अमित तांबोळकर), श्री महापुरुष भजन मंडळ कातवण (सुशांत जोईल) या जिल्ह्यातील निवडक दहा भजन संघांचा सहभाग आहे. विजेत्यांना ७००१, ५००१, ३००१ व प्रत्येकी सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रथम १५०१, द्वितीय १००१ रुपये व सन्मानचिन्ह व वैयक्तिक बक्षिसे आहेत. अधिक माहितीसाठी खजिनदार राजाराम गावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव अमेय गावडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT