कोकण

हातिवले येथील टोल नाका अज्ञातानी फोडल्याची

CD

24059
राजापूर ः हातिवले येथील टोल नाका अज्ञातांनी फोडला


हातिवले टोल नाका फोडला
मनसेचे दोघे ताब्यात; घोषणाजी करत केबिनची केली मोडतोड
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः हातिवले येथील मुंबई - गोवा महामार्गावरील टोल नाक्यावर आज सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास काही अनोळखींनी घोषणा देत अचानक केबिनची मोडतोड करीत काचाही फोडल्या आहेत. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी सायंकाळी मनसेच्या दोघा पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करताना चांद्रयान चंद्रावर पाठवण्याऐवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते, चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे पाहा, असा टोला लगावलेला होता. असे असतानाच आज सायंकाळी हातिवले येथील टोल नाका काही अअनोळखींनी फोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच सध्या मुंबई - गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली आहे. आगामी गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्याची लगबग सुरू असताना अद्यापही शासन व प्रशासन महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्याबद्दल लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आज सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी हातिवले येथील टोल नाक्याकडे मार्चा वळविला. त्यामध्ये या टोलनाक्यावरील केबीनची मोडतोड केली. केबीनच्या काचाही फोडल्या आहेत. दरम्यान या प्रकरणी राजापूर पोलिसानी सायंकाळी उशिरा मनसेच्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येइल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खड्ड्यांचा राग...
मुंबई - गोवा मार्गाचे काम रखडलेले असून असून खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्याबाबत सर्वसामान्य जनतेत संताप व्यक्त करण्यात येत होता. त्या रागातूनच टोल नाका फोडण्याचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

हातिवले येथील टोल नाका फोडल्याच्या संशयावरून मनसे पदाधिकाऱ्यांना राजापूर पोलिसानी ताब्यात घेतले आहे . यामध्ये मनसेचे दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

पोलिसांचा बंदोबस्त
महामार्गाच्या अपुऱ्या कामावरून राजापूरवासियांनी हातिवले येथील टोलनाका सुरू करण्याला यापूर्वी विरोध केलेला आहे. यावेळी टोलनाका विरोधी छेडलेल्या आंदोलनामध्ये वाहनचालक, लोकांसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारीही सहभागी होते. त्यावेळी हा टोलनाका चांगलाच चर्चेत आला होता. आता हा टोल नाका फोडल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तात्काळ पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT