कोकण

मा. संजू परब वाढदिवस विशेष

CD

पुरवणी डोके ः मा. संजू परब वाढदिवस विशेष

swt181.jpg
M24158
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासमवेत संजू परब.

swt182.jpg
M24159
माजी खासदार निलेश राणे यांच्यासमवेत संजू परब.

swt183.jpg
M24160
पत्नी संजना, मुलगी वैष्णवी, सई यांच्यासोबत संजू परब.

swt184.jpg
3M24161
नगराध्यक्ष पदाच्या काळात शहरातील विकासकामांचे भूमिपूजन करतांना संजू परब.

swt185.jpg
M24162
सावंतवाडीः शहरात आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना संजू परब.

swt186.jpg
M24163
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समवेत संजू परब.

swt187.jpg व swt188.jpg
M24164
संजू परब

बहुआयामी प्रेरणादायी नेतृत्व

लीड
प्रचंड ध्येयवाद अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसाविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत जनमानसात वेगळेच स्थान निर्माण करणारे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू उर्फ सच्चिदानंद परब. यांचा शनिवारी (ता.१९) वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर टाकलेला प्रकाशझोत...
- सतीश पाटणकर
------------
केवळ कोकणच्याच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपल्या ऊक्ती आणि कर्तुत्वाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे आकर्षण राहिले आहे. संजू परब हे याला अपवाद कसे राहतील? लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाची आवड असल्याने विद्यार्थीदशेपासूनच त्यांना नारायण राणे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला. मडूरासारख्या ग्रामीण भागातून येऊन महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता त्याला राजकारणाची आवड लागली. तेव्हा शिवसेनेनंतर काँग्रेस व आता भाजप पक्षात त्याचे अस्तित्व ठळकपणे उमटू लागले. लोकप्रिय नेते नारायण राणेंच्या तसेच संजू यांचे दैवत असणाऱ्या माजी खासदार निलेश राणेंच्या परिसस्पर्शाने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण, नितेश राणे यांच्या प्रोत्साहनामुळे अधिकच बहरत आहे.
राजकारणात आणि समाजकारणात स्वत:ला झोकून देऊन अल्‍पावधीत कोकणसह संपूर्ण महाराष्‍ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे तडफदार युवा नेतृत्‍व म्‍हणजे संजू उर्फ सच्चिदानंद परब. परब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक राजकीय नेता, मित्रांसाठी जिवाला जीव देणारा, कार्यकर्त्यांसाठी आधारवड, विरोधकांना तिथल्या तिथे प्रत्युत्तर देणारा, पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचा लाडका तर कुटुंबासाठी कुटुंबवत्सल असे हे बहुआयामी व्यक्तीमत्व. सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात. एकदा काम हाती घेतले तर त्याचा निपटारा केल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचा संजूचा स्वभाव असल्याने, त्याने अद्याप मागे वळून पाहिले नाही. सातत्याने आगेकूच करत आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. या संकटाच्या काळात संजू अनेकांच्या मदतीसाठी धावून आला. जिल्ह्यावर आलेल्या कोरोनाचा संकटातही ते लोकांच्या मदतीला धावले. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्याला बऱ्याच अंशी यशही आले. याच दरम्यान संजू याला कोरोनाची लागण झाली व त्यातच त्याच्या वडिलांचे (कै.) जगन्नाथराव परब यांचे निधन झाले. संजूसाठी हा मोठाच धक्का होता; पण त्यातूनही स्वतःला सावरून त्याने समाजकार्यात झोकून दिले. मिळालेल्या नगराध्यक्षपदाच्या उण्यापूर्या पावणेतीन वर्षात संजूने पंधरा कोटीचे सुसज्ज भाजीमार्केट, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नळ योजना, बॕरीस्टर नाथ पै हॉल, कचरा प्रकल्प, स्विमींग पुल आदी कामांना चालना दिली. त्याशिवाय नगरपालिकेचा गाडाही यशस्वीपणे हाकला. नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रश्नावर त्यांचे बारीक लक्ष असते. सर्वसामान्य लोकांचे जीवन सुसव्य व्हावे, यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम संजू परब यांनी केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत. त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा स्पर्धात्मक आहे. राजकारणा पलीकडे जाऊन सामाजिक हित जोपासण्याचे काम संजू परब नेहमीच करत असतात. सामाजिक बांधिलकीतून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम असेल किंवा आरोग्याशी निगडित समस्या असेल त्यावर गुणकारी औषध म्हणजे संजू परब असे मानले जाते. त्यामुळेच सामान्य माणूस त्यांना दैवत मानतो. समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधीची धडपड अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या धडपडीतूनच त्या-त्या भागाला नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांच्या हातून होत असते. त्याच पद्धतीने प्रचंड विकास कामाच्या जोरावर सामान्य जनतेच्या हृदयात संजू परब यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनात सहकार, क्रीडा यासह अन्य सर्व क्षेत्रातील त्यांनी केलेले काम हे त्यांच्या राजकीय यशस्वी कार्यपद्धतीचे गमक आहे. एवढ्यावर समाधान मानता त्यांनी त्यांच्या जोडीला मानवतेच्या भावनेतून केलेले काम तर त्याहून कितीतरी पटीने मोठे आहे. त्यांच्या कामाची नोंद घेतल्याशिवाय इतिहासालाही पुढे जाता नाही. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जनतेशी निगडित कामे करण्यात वेळ घालवणारे हे नेतृत्व सावंतवाडी तालुक्याला लाभलेले देणगी आहे. ग्रामपंचायतपासून शहरापर्यंत, घरापासून राज्यापर्यंत आणि घरच्या भांडणापासून राजकीय भांडणापर्यंत सर्व अडीअडचणी सोडवत प्रत्येक कार्यकर्त्याचे सर्वसामान्यांचे समाधान कसे होईल, याकडेच संजू परब यांचे लक्ष असते. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्यांनी ठेवली आहे. त्या जोरावर आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत त्यांनी सावंतवाडी तालुक्यात विजयश्री खेचून आणण्याचे काम केले आहे. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत त्याला आई-वडीलांसोबत त्याच्या सुयोग्य पत्नी संजना तसेच त्याच्या दोन्ही मुली वैष्णवी व सई यांची बहुमोल साथ लाभली. अशा बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या आमचा मित्र संजूला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पुर्ण व्हावे तुमचे
ह्या जन्मदिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
----------------
चौकट
कोरोना कालावधीत स्त्युस्त उपक्रम
कोरोना कालावधीत बेड उपलब्ध करून देणे, रक्त पिशव्या आणि प्लाझ्मा मिळवून देणे, गोरगरीब रुग्णांचे खाजगी रुग्णालयातील बील कमी करणे, यासारखी छोटी-छोटी पण अत्यंत महत्वाची कामे संजूने मार्गी लावली आहेत. नगराध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले. या संकटात देखील संजू यांनी जवळजवळ ५०० च्यावर कुटुंबीयांना मोफत अन्नधान्याचे तसेच जीवनापयोगी वस्तूंचे वाटप केले तसेच ''कमळ थाळी''च्या माध्यमातून जवळजवळ २५० जणांना दोन दिवस मोफत जेवणही दिले. त्याशिवाय मास्क, सॅनीटायझर वाटलेच; पण त्यावेळी तुटवडा असताना रेमीडेसीवीर इंजेक्शन पण अनेकांना उपलब्ध करून दिले.
---------------
(लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)
----------------
पुरवणी संकलन ः रुपेश हिराप
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT