१३ (टुडे ३ साठी)
-rat१८p१७.jpg-
२३M२४१३०
अर्थ बेर्डे
-----------
अर्थ बेर्डे याचे चित्रकला स्पर्धेत यश
रत्नागिरी : ग्रुप ग्रामपंचायत कोंडगावतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत अ (पहिली ते तिसरी) गटामधून अर्थ हेमंत बेर्डे याने प्रथम क्रमांक पटकवला. तो श्रीमती अरूधंती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. या स्पर्धेसाठी २२० स्पर्धकांनी सहभाग घेतला. अ गटामध्ये ६१ स्पर्धकांचा सहभाग लाभला. अर्थच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला कलाशिक्षक सुरज मोहिते यांचे मार्गदर्शन मिळाले.
-------------
-rat१८p२७.jpg-
P२३M२४१४६
रत्नागिरी ः सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात विद्यार्थ्यांना सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे गणवेश वितरण करताना पदाधिकारी.
-----------
सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे
जांभेकर विद्यालयात गणवेश वाटप
रत्नागिरी ः शहरातील सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अर्हम् जैन मंडळाने नुकताच गणवेश वाटपाचा कार्यक्रम विद्यालयात केला. या कार्यक्रमाला सुमति अर्हम् मंडळाचे पदाधिकारी सचिन जैन, अरविंद जैन, अक्षत संघवी, दीक्षित जैन, दीपक संघवी, प्रदीप जैन, विक्रम जैन, मानस जैन आणि नीलेश शहा उपस्थित होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने १९२५ मध्ये जांभेकर विद्यालय सुरू केले. हे रत्नागिरी शहरातील जुने विद्यालय आहे. येथे शहर आणि आसपासच्या गावांतून विद्यार्थी शिकण्यास येतात. सुमति अर्हम् जैन मंडळाने विद्यार्थ्यांना गणवेश दिले. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी मंडळाचे आभार मानले.
---------
-rat१८p२८.jpg-
२३M२४१४७
रत्नागिरी ः अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले.
------------
शिष्यवृत्तीतील गुणवंतांचा चित्पावन मंडळातर्फे सत्कार
रत्नागिरी ः अखिल चित्पावन विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्यावतीने पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ शिक्षिका मंजिरी लिमये उपस्थित होत्या. त्यांनी मुलांना गोष्टी सांगून उत्तम मार्गदर्शन केले. पाचवी, आठवीच्या १९ गुणवंत मुलांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांना एक होता कार्व्हर, मैत्री नकाशाशी, पर्यावरणाचे रखवालदार, हवामान शास्त्रज्ञ अण्णा मणी ही पुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाला मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कोषाध्यक्षा राधिका वैद्य, कार्यकारिणी सदस्य केतकी जोगळेकर, डॉ. संतोष बेडेकर, अविनाश काळे उपस्थित होते.
-------------
-rat१८p२९.jpg-
P२३M२४१४८
लांजा ः हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित क्रांती गाथा प्रदर्शन पाहण्यासाठी झालेली गर्दी.
---------
हिंदू जनजागृती समितीतर्फे
सहा ठिकाणी क्रांती गाथा प्रदर्शन
रत्नागिरी ः जिल्ह्यात हिंदू जनजागृती समितीअंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून समितीच्या कार्याशी जोडलेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या साहाय्याने सहा ठिकाणी क्रांतिगाथा प्रदर्शनाचे आयोजन केले. लांजा, रत्नागिरी, सावर्डे आणि चिपळूण येथे हे प्रदर्शन भरवले होते. आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या यज्ञात आहुती दिलेले क्रांतिकारक, त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेला त्याग याविषयी माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले. त्याचा लाभ महाविद्यालयातील १ हजार ११२ युवकांनी घेतला. प्रदर्शन पाहिल्यानंतर मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सांगितले की, यापूर्वी आम्हाला इतक्या वर्षात क्रांतिकारक म्हणजे कोण, त्यांनी काय केले हे ठाऊक नव्हते. समितीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली. ही माहिती आम्ही आमच्या मित्रपरिवाराला सांगण्याचा प्रयत्न करू. हे प्रदर्शन विविध भागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
-------------
खारवी समाजातर्फे रविवारी
खंडाळ्यात वधू-वर मेळावा
रत्नागिरी ः खारवी समाजसेवा महिला मंडळ (मुंबई) आणि खारवी समाज विकास समिती महिला मंडळ (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (ता. २०) वधू-वर मेळावा व शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाचे विनाशुल्क आयोजन केले आहे. खंडाळा येथील पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सकाळी ९ वा. कार्यक्रम होईल. सर्वजातीय समाजातील वधू-वरांची नोंद, कमी शिक्षण असलेल्या मुला-मुलींची नोंद, विधवा /विधूर/ घटस्फोटितांची नोंद या वर्गामध्ये निःशुल्क आहे. या मेळाव्यामध्ये दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेमध्ये शैक्षणिक मार्गदर्शन होईल. यात इंग्लिश स्पिकिंग, पोलिस भरती पूर्वतयारी, सैनिक भरती, सरकारी नोकरभरती, स्कॉलरशिप परीक्षा, परदेशातील उच्च शिक्षण (आर्थिक नियोजन), व्यक्तिमत्व विकास व कागदपत्रे पूर्वतयारी या सर्व विषयांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात संतोष पावरी, डॉ. सुहास वासावे, विवेक बारगीर, माधव अंकलगे, अंकुश आडेकर, नितीन पटेकर, स्नेहल पावरी, नलिनी पवार, सायली वासावे, मनाली वरवटकर, संध्या ठाकूर, संजीवनी थोरात, अपूर्वा लाकडे यांचा विशेष सहभाग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.