swt189.jpg
M24174
सावंतवाडीः फुटबॉल क्लब या लोगोचे अनावरण करताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, संदिप गावडे व अन्य.
‘एफसी सावंतवाडी’ असोशिएशनची घोषणा
लोगोचे अनावरणः क्रीडा वारसा जपण्यासाठी संदिप गावडेंचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः संस्थानकालीन पार्श्वभूमी लाभलेल्या सावंतवाडी शहराचा सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जपण्यासाठी भाजपाचे युवा नेते संदिप गावडे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘एफसी सावंतवाडी’ या असोशिएशनची घोषणा करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत लोगोचे अनावरण करण्यात आले.
फक्त स्पर्धा घेवून न थांबता येथे नव्याने खेळाडू घडावेत, यासाठी ‘एफसी सावंतवाडी’च्या माध्यमातून या ठिकाणी शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसरीकडे हिरण्यकेशीचे संवर्धन करण्याचा आमचा हेतू असून या कामाला ‘माई हिरण्यकेशी संवर्धन’ या उपक्रमांअंतर्गत सुरूवात करण्यात आली आहे. त्याला आता संबंधित गावातील ग्रामस्थांनी अंतिम स्वरूप द्यावे. हिरण्यकेशचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे संदिप गावडे यांनी आवाहन केले. या ठिकाणी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने या क्लबची घोषणा करण्यात आली.
यावेळी श्री. गावडे यांनी या मागणी भूमिका विषद केली ते म्हणाले, ‘‘या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे फक्त स्पर्धा घेवून न थांबता या पुढे ही अशा प्रकारचे उपक्रम राबविले जावेत तसेच नवोदीत खेळाडू घडविण्यासाठी सावंतवाडी फुटबॉल क्बलची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा आता सावंतवाडीसह जिल्ह्यातील खेळाडुंना करुन देण्यात येणार आहे. या ठिकाणी तंत्र आणून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.’’
श्री. गावडे पुढे म्हणाले, ‘‘आंबोली येथून कोल्हापुरकडे जाणाऱ्या हिरण्यकेशी या नदीचे संवर्धन आणि खोलीकरण करण्याचा निर्णय आम्ही मागच्या वर्षी घेतला. स्वखर्चाने आणि लोकसहभागातून आंबोली-गावठाणवाडी आणि कामतवाडी या परिसरातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे दरवर्षी येणारे पाणी यावर्षी मात्र त्या ठिकाणी आले नाही. त्यामुळे लोकांचे होणारे नुकसान थांबले. आता ही मोहीम अगदी कोल्हापूरपर्यंत राबविण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढाकार घेणार आहोत.’’
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, माजी तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, राजू राऊळ, निलेश तेंडोलकर, विनय केनवडेकर, श्रीपाद तटवे, संदिप हळदणकर, दिलीप भालेकर, समर्थ राणे परिक्षीत मांजरेकर, गुरूनाथ कासले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.