24178
मुंबई ः लाँग मार्चमध्ये सहभागी समतादुतांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
‘बार्टी’ समतादूतांचा
मुंबईत लाँग मार्च
समायोजनची मागणी; पोलिसांनी घेतले ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या समतादूतांचे समाजकल्याण विभागात समायोजन व्हावे, या प्रमुख मागणीसाठी समतादूतांनी ९ ऑगस्टपासून पुणे ते मुंबई पायी लाँग मार्चचे आयोजन केले होते. १५३ किलोमीटर पायी प्रवास करीत समतादूतांचा लाँग मार्च गुरुवारी (ता.१७) मुंबईत पोहचला. लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या समतादूतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या समतादूतांना पोलिसांनी आझाद मैदान येथे नेऊन सोडले; परंतु, जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट होत नाही, तोपर्यंत मुंबईतून हलणार नसल्याचे समतादूतांनी स्पष्ट केले आहे.
समतादूतांच्या समायोजनेविषयी स्वयंस्पष्ट अहवाल बार्टीस्तरावरून मंत्रालय कक्ष अधिकाऱ्यांना १८ मेस पाठविला आहे. हा अहवाल प्रलंबित न ठेवता शासनाने स्वीकारून समतादूतांचे समाजकल्याण विभागामध्ये १५ ऑगस्टपूर्वी समायोजन करावे. समतादूतांना समायोजनेचे लाभ २०१६ पासून द्यावेत, या मागणीसाठी राज्यातील समतादूतांनी ९ ऑगस्टपासून बार्टी पुणे ते मुंबई, असे पायी लाँग मार्चचे आयोजन केले होते. ९ दिवसांचा पायी प्रवास करून समतादूत काल मुंबईत दाखल झाले. मुंबईत पोलिस प्रशासनाने समतादूतांना ताब्यात घेतले व आझाद मैदान येथे नेऊन सोडले.
-----
मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत ठाम
९ ते १७ ऑगस्ट कालावधीत पुणे ते मुंबई पायी लाँगमार्चमध्ये राज्यातील समतादूत सहभागी झाले होते. या लाँगमार्चच्या प्रवासात २० पेक्षा जास्त समतादूतांची प्रकृती बिघडली. काही समतादूतांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते; परंतु, समतादूतांनी मुंबई पर्यंतचा लाँग मार्च सुरूच ठेवला होता. समाजकल्याण विभागचे खाते मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे समतादूतांच्या समयोजनाचा प्रश्न तेच सोडवू शकतात. मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याशिवाय मागे परतणार नसल्याचे समतादूतांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.