कोकण

पत्रकार संरक्षण कायद्याबाबत मालवणात तहसीलदारांना निवेदन

CD

24179
मालवण ः तहसीलदार वर्षा झालटे यांना निवेदन सादर करताना तालुका पत्रकार समिती पदाधिकारी.

पत्रकार संरक्षण कायद्याबाबत
मालवणात तहसीलदारांना निवेदन
मालवण ः पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, पत्रकारांवरील खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावे व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी तालुका पत्रकार समितीच्यावतीने तहसीलदार वर्षा झालटे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात यावे, अशी मागणी पत्रकारांनी केली. यावेळी पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौंगधराज बादेकर, मनोज चव्हाण, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत, कृष्णा ढोलम, संग्राम कासले, समीर म्हाडगुत आदी उपस्थित होते.
---
23813
महेंद्र माणगावकर

देवगड ठेकेदार संघटना अध्यक्षपदी माणगावकर
देवगड ः येथील देवगड तालुका ठेकेदार अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी महेंद्र माणगावकर, सचिवपदी दिलीप कदम यांची बिनविरोध निवड झाली. तालुक्यातील अभियंता ठेकेदार संघटनेच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष रणजित जाधव, सचिव कदम, कोषाध्यक्ष प्रसाद कुळकर्णी. दरम्यान, यावेळी सुशील लोके, समीर पेडणेकर, नीतेश जाधव, हेमंत देसाई, मंगेश रजपूत, बिपीन कोरगावकर, सदाशिव सरोळकर आदी तालुक्यातील ठेकेदार उपस्थित होते.
--
चर्मकार समाज मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार
कणकवलीः सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या कणकवली शाखेतर्फे रविवारी (ता.२०) सकाळी १० वाजता येथील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबईतील उद्योजक संजय चव्हाण यांच्या हस्ते होईल, तर अध्यक्षस्थानी कणकवलीचे तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण असतील. मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, उद्योजक सुनील नारकर, गणेश जाधव, माजी नगरसेवक अॅड. विराज भोसले, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, कोषाध्यक्ष नामदेव जाधव, एस. टी. को-ऑप बँक कणकवली शाखा व्यवस्थापक प्रवीण म्हापणकर, माजी आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. केशव पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जिल्हा सदस्य आनंद जाधव, मयुरी चव्हाण, मंगेश आरेकर, तालुका कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण, सचिव अविनाश चव्हाण, खजिनदार संजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT