फोटो ओळी
-rat१८p३६.jpg- KOP२३M२४१७३ रत्नागिरी पालिका अग्निशमन दल
--------------
सकाळ विशेष...लोगो
फायर सेफ्टी ऑडिटसाठी १५० संस्थांना नोटिसा
रत्नागिरी नगरपालिका अग्निशमन दल ; आगीच्या घटना रोखण्यासाठीची उपाययोजना
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः फायर सेफ्टी ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट न केलेल्या शहरातील सुमारे १५० शैक्षणिक संस्था, व्यावसायिक, १५ ते २० वर्षे झालेल्या सोसायट्या आदींचा यामध्ये समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये यांना नोटीस पाठवूनही कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत पुन्हा यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. आगीच्या वाढत्या घटनांना रोखण्याच्या दृष्टीने आणि सुरक्षेसाठी पालिकेच्या अग्निशमन दलाने ही कारवाई केली आहे.
शहरात सार्वजनिक ठिकाने, खासगी दवाखाने, बँक, गोडावून, खासगी व्यावसायिक, शाळा, कोचिंग क्लासेस व सेंटर, नर्सिंग होम, मनोरंजन केंद्र, व्यापारी संकूल, रेस्टॉरंट, हॉटेल, बीअर बार अशा अनेक संस्था आहेत. या सर्व मालमत्ताधारकांनी त्यांच्या व्यवसायाचे महाराष्ट्र राज्य अग्निप्रतिबंधक व जीवनरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार उपाययोजना करणे अपेक्षित आहे. त्यांना वर्षभरातून सहा-सहा महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे सेफ्टी फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे.
अग्निशमन यंत्रणा बसवली आहे का, याची पालिकेच्या अग्निशमन दलाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते तसेच इलेक्ट्रिक ऑडिटदेखील करण्यात येते. त्यासाठी शासनातर्फेही स्वतंत्र एजन्सी नेमली जाते. त्यांच्यामार्फत ऑडिट करून अहवाल घेतला जातो. पालिका क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांना सूचित केलेल्या एजन्सीशी संपर्क करून आपली इमारत व व्यावसायिकांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना त्यातील त्रुटी आवश्यक सुधारणा आदी परीक्षण करून निश्चित कारवाई पूर्ण करून १५ दिवसाच्या आत या मान्यताप्राप्त एजन्सीद्वारे प्रमाणपत्र प्राप्त करून पालिकेला सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत पालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील १५० संस्थांना फायर सेफ्टी ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट संदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. पालिकेच्या हद्दीतील बहुतांश व्यावसायिक व सार्वजनिक संस्थांनी त्यांच्या बिल्डिंग नियमानुसार नियमित फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. दुर्घटनेत प्राण व वित्तहानी झाल्यास तोपर्यंत बराच विलंब झालेला असतो. त्यामुळे मालमत्ताधारक व पालिका प्रशासन यांच्यात वाद होतात. पालिकेच्या नोटिसीकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्याचेही दिसून येते.
चौकट
हानी झाल्यास मालमत्ताधारक जबाबदार
फायर सेफ्टी ऑडिट न केल्यास आगीसंबंधित होणाऱ्या दुर्घटनेमध्ये प्राणहानी अथवा वित्तहानी झाल्यास संबंधित मालमत्ताधारकांना जबाबदार धरण्यात येणार येते तसेच संबंधितावर प्रतिबंध लावला जाऊ शकतो, असे पालिका अग्निशमन विभागाने सांगितले.
कोट...
आगीच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिक, संस्थांना फायर सेफ्टी ऑडिट करण्यासंदर्भात नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात नोटिसा दिल्या होत्या. आता पुन्हा नोटिसा काढण्यात येणार आहेत.
- महेश साळवी, अग्निशमन विभाग, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.