कोकण

केसरकरांमुळेच प्लॉट वितरण रखडले

CD

24195
सावंतवाडी ः पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. शेजारी संजू परब, महेश सारंग, रविंद्र मडगावकर आदी.

केसरकरांमुळेच प्लॉट वितरण रखडले

राजन तेली; आडाळी एमआयडीसीवरुन टीका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः आडाळी एमआयडीसीबाबत स्थानिक नेतृत्व दीपक केसरकर यांनी पत्र दिल्यानेच तेथील प्लॉट वितरणाची प्रक्रीया लांबली आहे. शासनाने यात गांभिर्याने पाहणे गरजेचे होते; मात्र, तसे न झाल्याने सत्तेत असलो तरी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोडामार्गमधील ज्या सरपंचांनी लाँग मार्च आयोजित केला, त्यात भाजप म्हणून सहभागी होणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे सांगितले. दहा वर्षांत एकही उद्योग न येणे हे स्थानिक नेतृत्वाचेच अपयश आहे. आमचे प्रयत्नही तोकडे पडले; मात्र, आता तरी याकडे उद्योगमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे श्री. तेली म्हणाले.
श्री. तेली यांनी आज या ठीकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, महेश धुरी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, प्रमोद गावडे, बंटी पुरोहीत, अमित परब, संदेश टेमकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. तेली म्हणाले, ‘‘या ठिकाणी आडाळी एमआयडीसी मंजूर होवून तब्बल दहा वर्षांचा कालखंड लोटला आहे; परंतु, अद्याप त्या ठिकाणी प्लॉट लोकांना मिळाले नाही. स्थानिक नेतृत्वाने मोठा उद्योजक आणणार असे पत्र देवून ठेवल्यामुळे ही प्रक्रीया लांबली आहे. या ठिकाणी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली; मात्र, ती बैठक पाच मिनीटांत आटोपती घेण्यात आली. हे सर्व चुकीचे असून उद्योगमंत्र्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. केसरकरांनी आत्तापर्यंत केवळ आश्वासने देऊन येथील तरुणांची थट्टा केली आहे. अजून किती दिवस येथील भोळ्या जनतेची थट्टा करणार? त्यामुळे केवळ सरकारला जाग यावी, यासाठी आम्ही २० ऑगस्टच्या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT