24222
पूर्वा गावडे
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी
ओरोस येथील पूर्वाला संधी
ओरिसातील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील सिंधुदुर्गकन्या पूर्वा गावडे हिची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तीने ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अक्वॅटिक चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सातवा नंबर पटकावला आहे आणि राष्ट्रीय स्तरावर पहिल्या आठमध्ये येण्याचा मान मिळवला आहे.
राज्य जलतरण असोसिएशन यांच्यामार्फत नुकतीच पुणे येथे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. त्यात पुणे बालेवाडी येथे बालाजी केंद्रे यांच्याकडून जलतरणचे प्रशिक्षण घेत असलेली पूर्वांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठो निवड झाली. या निवडीसाठी राज्य जलतरण फेडरेशनचे सचिव राजू पालकर, अजय फाटक ,कैलास आखाडे यांनी विशेष प्रयत्न केले.
पूर्वांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत निवड झाल्यानंतर ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या ३९ व्या सब ज्युनियर व जयुनियर राष्ट्रीय अॅक्वॅटिक चॅम्पियनशिप या स्पर्धेत तीने १५०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत १९ मुलीमधून तीने सातवा क्रमांक पटकवला व राष्ट्रीय स्तरावर पहिल्या आठ जणामध्ये येण्याचा मान मिळविला आहे. पूर्वाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. ती पाच वर्षाची असल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये प्रशिक्षक प्रवीण सुलोकार, वेंगुर्ले येथील प्रशिक्षक दीपक सावंत यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तिची पुणे बालेवाडी येथे जलतरण प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्याठिकाणी प्रशिक्षक केंद्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेत असून तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.