

Aarey dairy comeback
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईकरांच्या पसंतीचे आणि विश्वासाचे ‘आरे’ दूध पुन्हा एकदा पिशवीबंद स्वरूपात बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. महानंद दुग्धशाळेच्या सहकार्याने ‘आरे’चे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, १५ मेपर्यंत हे दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईकर ग्राहकांची वाढती मागणी आणि ‘आरे’ स्टॉलधारकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाने मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना एक प्रस्ताव सादर केला होता.