कोकण

दाभोळ ः निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजरला अटक

CD

पान १ साठी


नीलिमाच्या मृत्यूप्रकरणी
प्रकल्प व्यवस्थापकास अटक
आत्महत्येस भाग पाडले; उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दबाव
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १८ ः चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नीलिमाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबाबत स्टेट बँकेतील प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड याला रत्नागिरी येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
दाभोळ खाडीत उसगाव येथे १ ऑगस्टला मृतावस्थेत मिळालेल्या नीलिमाच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी दाभोळ सागरी पोलिस ठाण्यातून तपास सुरू आहे. या तपासात नीलिमाच्या व्हिसेराची सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणीअंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे. तसेच मृत्यूचे अंतिम कारण बुडाल्यामुळे श्वास बंद झाल्याचे नमूद केले आहे. चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आहे. नीलिमाच्या संशयास्पद मृत्यूचा पोलिस तपास सुरू असताना तिचे नातेवाईक सुधाकर चव्हाण यांनी चिपळूण पोलिस ठाणे येथे काल (ता. १७) तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत स्टेट बँकेतील प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार संशयित गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तो दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.
तक्रारीत सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी नमूद केले आहे की, १५ एप्रिल ते २९ जुलै या काळात नीलिमा काम करत असलेल्या दापोली येथील बँकेतील प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड (मूळ रा. कोल्हापूर) याला तिच्या दैनंदिन कामकाजाबाबत रिपोर्टिंग करावे लागत असे. ऑफिसमध्ये तिच्या कामाबाबत गायकवाड याच्याकडून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार सुट्टीवर असतानादेखील फोन येत असत. आपल्या मुलीस दिवसाला ४ ते ५ डी-मॅट खाती उघडण्यासाठी संग्राम गायकवाड जाणूनबुजून दबाव आणत असल्याबाबत आपल्याला व तिचा भाऊ अक्षय यास सांगत असे. प्रकल्प व्यवस्थापक गायकवाड हा नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर उद्दिष्ट पूर्ण करण्याचा दबाव आणत होता. नीलिमाने प्रामाणिक प्रयत्न करूनदेखील तिला काम जमत नसल्याचे बोलून कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती व यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती. ती घरामध्ये व्यवस्थित जेवत नव्हती. सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीअन्वये दाभोळ सागरी पोलिस ठाणे येथे नीलिमाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत संग्राम गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला काल (ता. १७) रात्री अटक केली. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT