24287
देवबाग ः येथील जिओ ट्यूब बंधाऱ्याची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली.
देवबाग येथील बंधाऱ्याची
आमदार नाईकांकडून पाहणी
काम पूर्ण; किनारपट्टीची धूप रोखण्यास होणार मदत
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ ः तालुक्यातील देवबाग समुद्र किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक जिओ ट्युब बंधाऱ्याची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. जिओ ट्युब बंधाऱ्यासाठी आमदार नाईक यांनी अडीच कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार बंधाऱ्याचे चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता समुद्र किनारपट्टीची धूप रोखण्यास मदत होत आहे. देवबाग येथील ४ कोटीच्या दगडी धूप बंधाऱ्याच्या कामाचा आढावा घेत उर्वरित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे कामही लवकरच होईल, असे आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
अनेकांनी धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्याची अनेकदा आश्वासने दिली; मात्र आमदार नाईक यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल देवबाग ग्रामस्थांनी आमदार नाईक यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. देवबाग खाडीकिनारी ८ कोटींचा बंधारा प्रस्तावीत आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर या कामाला देखील सुरुवात होणार आहे. देवबाग येथील उर्वरित बंधारा देखील लवकरच पूर्ण होईल असे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख सन्मेष परब, महिला तालुका संघटक दिपा शिंदे, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर, युवती सेना तालुका संघटक निनाक्षी शिंदे, हेमंत मोंडकर, शाखा प्रमुख रमेश कद्रेकर, शाखा प्रमुख अक्षय वालावलकर, शाखा प्रमुख मोहन कांदळगावकर, ग्रामपंचायत सदस्य फिलसू फर्नांडिस, सुप्रिया केळुसकर, मोरेश्वर धुरी, अण्णा केळुसकर, महेश सामंत, बबन माडये, योगेश सारंग, परेश सादये, दया टिकम, विलास वालावलकर, आनंद तारी, विशाल डोंगरे, निर्मला माडये, गणपत राऊळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.