कोकण

फिजिओथेरपी शिबिरात ७६ जणांची चिकित्सा

CD

24765
कुडाळ ः आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन करताना दिनेश आजगावकर. शेजारी डॉ. जी. टी. राणे, डॉ. संजय केसरे, डॉ. नवांगुळ, डॉ. मनाली पटवारी, डॉ. उन्मेष पटवारी आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

फिजिओथेरपी शिबिरात ७६ जणांची चिकित्सा

कुडाळातील उपक्रम; ‘रोटरी’, मेडिकल असोसिएशनचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः येथील डॉ. जी. टी. राणे हॉस्पिटल येथे रोटरी क्लब ऑफ कुडाळ, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिजिओथेरपी वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील ७६ जणांनी लाभ घेतला.
रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष दिनेश आजगावकर, डॉ. जी. टी. राणे, कुडाळ इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे, सचिव डॉ. अमोघ चुबे, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट सिंधुदुर्गचे डॉ. मनाली पटवारी, डॉ. उन्मेष पटवारी, डॉ. दत्तात्रय ठाकूर, डॉ. श्वेता जगताप, डॉ. योगेश नवांगुळ, डॉ. स्पृहा गोगटे, डॉ. श्रद्धा पटेल, डॉ. ज्योत्स्ना पटेल, डॉ. तेजश्री सावंत, डॉ. अँजेलो रोटरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. राजीव बिले, रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माजी असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, खजिनदार रुपेश तेली, माजी अध्यक्ष सचिन मदने, अभिषेक माने, अमित वळंजू, राजीव पवार आदी उपस्थित होते.
शिबिरामध्ये उपस्थित सर्व रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. डॉ. मनाली पटवारी यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील विविध व्याधीग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना गेल्यावर्षी येथील गटसाधन केंद्रात समग्र शिक्षा अभियानांतर्गत फिजिओथेरपी आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याचे सांगितले. डॉ. राणे यांनी वैद्यकीय व्यवसायासह सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले. दिनेश आजगावकर यांनी या शिबिरासाठी कुडाळ रोटरी क्लबने सहभाग घेतल्याची माहिती दिली.
---
...तर बरेचसे जुनाट आजार बरे
उद्‍घाटन प्रसंगी डॉ. केसरे यांनी फिजिओथेरपिस्ट आरोग्य शिबिराचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘उपचारांमध्ये डॉक्टरांची चिकित्सा व औषधे याबरोबरच सांधेदुखी, स्नायूदुखी, जन्मजात व्यंग, प्यारेलायसिस, नसांची दुखी, सायटिका, सांध्यांची कमी हालचाल होणे अशा कितीतरी जुनाट आजारांसाठी फिजिओथेरपीची गरज भासते. फिजिओथेरपीमध्ये ठराविक स्नायूंचे व्यायाम व स्नायूंची ताकद वाढविण्यासाठीचे उपचार केले जातात. या उपचारामुळे रुग्णांचे बरेचसे जुनाट आजार बरे होऊन रुग्णास पूर्वीसारखी हालचाल, स्नायूंची ताकद व दैनंदिन कामे करण्यासाठी शारीरिक शक्ती प्राप्त होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT