कोकण

ऑस्ट्रेलियात संधी असतानाही अनुजा रत्नागिरीत राहिली

CD

१२ (टुडे पान ३ साठी, अँकर)

- rat२१p१.jpg-
23M24829
रत्नागिरी ः ईझीऑडिओ हिअरिंग क्लिनिक प्रारंभाप्रसंगी बोलताना अनुजा कुलकर्णी. व्यासपिठावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी.
--------------

ऑस्ट्रेलियात संधी असतानाही अनुजाचे रत्नागिरीत वास्तव्य

डॉ. श्रीधर ठाकूर ; इन्फिगोमध्ये इझी ऑडिओ हिअरिंग क्लिनिक

रत्नागिरी, ता. २१ ः अनुजा कुलकर्णी हिने इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये इझी ऑडिओ हिअरिंग क्लिनिक सुरू करून ती इन्फिगो परिवाराचा एक भाग म्हणून सेवा देणार आहे. ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी असतानाही तिने वडील पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासोबत रत्नागिरीतच सेवा देण्याचा निर्णय घेतला. ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी काढले.
इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल ईझी ऑडिओ हिअरिंग क्लिनिक यांच्या सहयोगाने ऑडिओलॉजीच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी कीर्तीकुमार पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, इन्फिगो ग्रुप व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, ईझी ऑडिओ हिअरिंग क्लिनिक ऑडिओलॉजिस्ट अनुजा कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, या आगळ्या ऑडिओलॉजिस्टसारख्या क्षेत्रात अनुजा काम करतेय तेही ऑस्ट्रेलियाला जाण्याचे तिने रद्द केले आणि स्थानिकांना प्राधान्य दिले आहे. या सेवेचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. ऐकू न येईपर्यंत थांबू नका. त्या आधी आपल्या सर्व आजारांविषयी नियमित तपासणी करून घेतले पाहिजे. अनुजाने रत्नागिरीत थांबून सेवा देण्याचा निर्णय आणि इन्फिगोने तिला दिलेली साथ फार महत्वाची असते.

शरीराचे सर्व्हिसिंगही महत्वाचे...
या प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गाडी बंद पडू नये सुरळीत चालावी म्हणून जसे आपण गाड्यांची सव्हिसिंग करतो तसे आपल्या शरीराचे वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT