कोकण

दापोली रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन

CD

२८ (टूडे २ साठी)

दापोली रुग्णालयात रिक्त पदे भरणार
जिल्हा शल्य चिकित्सकांचे आश्वासन ; मराठी पत्रकार परिषदेचे उपोषण स्थगित

दाभोळ, ता. २१ ः दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांसाठी स्वातंत्र्यदिनी मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या दापोली शाखेतर्फे केलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक व दापोली तहसीलदार यांनी रिक्त पदांबाबत लोकप्रतिनिधीसमवेत मंत्रालयात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दापोली उपजिल्हा रुग्णालयात अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत नाहीत. या रुग्णालयात जनरल सर्जन, एमडी मेडिसीन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ आदी पदे रिक्त असून ही पदे पूर्णवेळ भरली जावीत, ही मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे. यासाठी यापूर्वी २६ जानेवारीला मराठी पत्रकार परिषद शाखा दापोलीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व आमदार योगेश कदम यांनी ही पदे भरण्याबाबत आश्वासित केल्याने त्या वेळी उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने १५ ऑगस्टपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोर मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा दापोलीचे सदस्यांनी उपोषण सुरू केले.
या उपोषणाची दखल घेऊन दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी पत्रकारांची भेट घेऊन रुग्णालयातील रिक्त पदांबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. गावडे यांनी रिक्त पदांबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT