कोकण

रत्नागिरी ः ‘रत्ना- 8’ वाणाची 80 टन विक्री

CD

१३ (टूडे पान ३ साठी, मेन)

‘रत्ना- ८’ वाणाची ८० टन विक्री

कोकणातून वाढती मागणी; गतवर्षीपेक्षा ३० टन अधिक पुरवठा

रत्नागिरी, ता. २१ ः चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ‘रत्नागिरी-आठ’ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचली आहे. राष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली ही जात असल्यामुळे देशातील काही खासगी कंपन्या विद्यापिठाच्या मान्यतेने ‘रत्नागिरी आठ’ बियाणे तयार करण्यास सरसावले आहे. यंदा ८० टनएवढी विक्री झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव भात संशोधन केंद्रातर्फे २०१९ ला ‘रत्नागिरी आठ’ हे वाण विकसित केले. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली असून, कोकणासह विदर्भातही मागणी होत आहे. या वाणाला उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांतूनही पसंती मिळाली आहे. बदलत्या हवामानात टिकणारी ही योग्य जात असून, उशिराने पडणाऱ्या पावसाचा फटका याला बसत नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत या बियाण्याची लागवड केली जात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रत्नागिरी व फोंडा (सिंधुदुर्ग) केंद्रावर मिळून ८० टन बियाणांची विक्री झाली आहे. गतवर्षी ५० टन विक्री झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मागणी वाढली आहे. अजून मागणी होती; मात्र, बियाण्यांची कमतरता भासली. ‘सुवर्णा’ या जातीला पर्याय म्हणून ‘रत्नागिरी आठ’ ही जात विकसित केली. १३५ ते १४० दिवसांत हे भातपिक तयार होते. कापणी वेळेवर केल्यास तांदळाचा तुकडा होण्याचे प्रमाण कमी आहे. मध्यम उंची असल्यामुळे जमिनीवर लोळत नाही. करपा किंवा कडा करपा या रोगाला प्रतिकारक असून, वेळेवर पेरणी व लावणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. विद्यापीठ प्रक्षेत्रात जागेची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांच्या मदतीने बियाण्याची लागवड केली जाते. बिजोत्पादन वाढीसाठी महामंडळाने तयारी दर्शवली तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाणाची उपलब्धता करून देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

..........
कोट

कोकण कृषी विद्यापिठांतर्गत शिरगाव भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताच्या अकरा जाती व एक संकरित जात विकसित केली आहे. ‘रत्नागिरी १’ हे वाण जुने असून, देशाबरोबरच अमेरिका व दक्षिण आफ्रिकेत या वाणाने लोकप्रियता मिळवली असताना आता ‘रत्नागिरी आठ’ या वाणाला परराज्यातही पसंती मिळाली आहे. वाढत्या मागणीमुळेच विक्रमी विक्री होऊ शकली आहे.

-डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, भात संशोधन केंद्र शिरगाव (रत्नागिरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT