कोकण

वरवडे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

CD

१८ (पान २ साठी, संक्षिप्त)


-rat२१p३.jpg ः
P२३M२४७७७
रत्नागिरी ः वाटद-खंडाळा येथील विद्यालयात वकृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवताना मान्यवर.
--------

वरवडे विद्यालयात वकृत्व स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ''टिळकांचे बालपण व शिक्षण'' आणि ''टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य'' यावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये पाचवी ते सातवी गटात अनुक्रमे तन्वी मोहित, मृणाली पाष्टे, प्रांजल कुर्टे, तर आठवी ते अकरावीच्या गटात सृष्टी शितप, वैदेही वैद्य, रेश्मी मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक पोतदार, श्री. सरगर, श्री. माने, जंगम आदी उपस्थित होते. प्रमुख वक्ते सरगर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख चिले यांनी केले.
-------

-rat२१p४.jpg-
२३M२४७७८
राजापूर ः विज्ञान मेळाव्यात वकृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची मानकरी सिद्धी पांचाळ हिचा सत्कार करताना मान्यवर.
--------

विज्ञान मेळाव्यात सिद्धी पांचाळ प्रथम

रत्नागिरी ः अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात झालेल्या वक्तृत्व व प्रश्नमंजूषा स्पर्धेत राजापूरच्या माध्यमिक शाळेची दहावीत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी पांचाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धा माध्यमिक शाळा तालुका राजापूर येथे झाल्या. या स्पर्धेसाठी शाळेतील विज्ञानशिक्षिका शुभांगी शिंदे-देसाई यांनी सिद्धीची तयारी करून घेतली होती व स्वतःही हजर राहिल्या होत्या. तिचे वक्तृत्व प्रभावी असल्याने ती प्रथम तीन क्रमांकात असणार याची आम्हाला खात्री होती. त्याप्रमाणे तिने वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला; पण प्रश्नमंजूषा स्पर्धेत काय यश मिळवणार यावर तालुक्यातील प्रथम क्रमांक अवलंबून होता. प्रश्नमंजुषेसाठी खूप चांगली तयारी व दिलेल्या उत्तरामुळे सिद्धी यशस्वी झाल्याचे शिक्षिका देसाई यांनी सांगितले.
------------
-rat२१p७.jpg ः
P२३M२४७८०
पोफळी ः येथील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी नाग बनवण्याचे प्रात्यक्षिक करताना.
------------
पोफळी शाळेत मातीचे नाग बनवणे स्पर्धा

चिपळूण ः तालुक्यातील पोफळी प्राथमिक शाळा येथे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मातीचे नाग बनवणे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये पहिली ते चौथीच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शाडू तसेच मातीपासून स्पर्धकांनी हुबेहूब नागांच्या प्रतिकृती तयार करून त्यावर सजावट तसेच रंगकाम केले. ही स्पर्धा नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली. विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या जीवनातील नागाचे (सापाचे) महत्व समजावे, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे हे कळावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांनी या स्पर्धेविषयी विशेष मार्गदर्शन केले. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका शिवानी शिंदे, प्रतिभा धुमाळ, अशोक मिसाळ, साधना गायकवाड तसेच मनीषा नाईक यांचे सहकार्य लाभले.
-----------
-rat२१p८.jpg ः
P२३M२४७८१
साडवली ः देवरूख मंगळागौर स्पर्धेला महिलांचा प्रतिसाद.
-rat२१p९.jpg ः देवरूख भाजपाच्या मंगळागौर स्पर्धेतील एक क्षण.
--------
मंगळागौर स्पर्धेला देवरुखात अभूतपूर्व प्रतिसाद

साडवली ः भारतीय जनता पार्टी संगमेश्वर पुरस्कृत मंगळागौरी स्पर्धांचे आयोजन देवरूख येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. मंगळागौरी पूजन हा भारतीय विशेषकरून हिंदू संस्कृतीतील महिलांचा अत्यंत प्रिय असा उत्सव आहे. त्यामुळे तालुक्यातील महिलांना एका मंचावर एकत्रित करण्याच्या उद्देशाने महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. अभूतपूर्व प्रतिसाद आणि तालुक्यात प्रथमच अशी स्पर्धा आयोजित करूनही महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. एकापेक्षा एक सरस खेळ करत सर्व संघांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमाला भाजपा (द.) महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार, माजी जि. प. अध्यक्षा रश्मी कदम, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, महिला मोर्चा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता रूमडे, संगमेश्वर तालुकाध्यक्षा कोमल रहाटे, राजापूर तालुकाध्यक्षा श्रुती ताम्हणकर आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

SCROLL FOR NEXT