कोकण

साडवली-जंगम कुटुंबीयांसाठी सिद्धेश ब्रीद ठरले देवदूत

CD

फोटो ओळी
-rat२१p२९.jpg ः२३M२४८७८ देवरूख ः जान्हवी जंगम


जंगम कुटुंबीयांसाठी सिद्धेश ब्रीद ठरले देवदूत
कॅन्सरग्रस्त जान्हवीला सहाय्य ; डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी केली मदत
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २१ ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूख बोटकेवाडी येथील राहणाऱ्या जान्हवी जंगम या ११ वर्षाच्या मुलीच्या डोळ्यांना कॅन्सरचा आजार होता. त्यामुळे तिचा एक डोळा निकामी झाला होता. त्या मुलीची शस्त्रक्रिया करण्याइतपत पैसे त्याच्या कुटुंबाकडे नव्हते; मात्र ही बाब तांबेडी गावचे सुपुत्र व उद्योजक सिद्धेश ब्रीद यांना समजताच त्यांनी तत्काळ जान्हवीची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे एका डोळ्याने अंध असणाऱ्या जान्हवीला दुसरा कृत्रिम डोळा बसवण्यात आला आहे.
इतर मुलींप्रमाणे दोन डोळे भरून असावेत, ती सुंदर दिसावी या उद्देशाने जान्हवीच्या आई-वडिलांची इच्छा होती; पण आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ते हतबल होते. ही बाब समजताच सिद्धेश ब्रीद यांनी मदत केल्यामुळे त्यांच्यासाठी खरच देव म्हणून उभा राहिला.
जान्हवी ही ११ वर्षाची असताना तिला कॅन्सरसारख्या आजार झाला व हा आजार डोळ्यावर जाऊन पोहोचला आणि तिचा एक डोळा निकामी झाला. या आजारामुळे तिला आयुष्यात अंधत्व स्वीकारावं लागलं. तिच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी आई-वडील मदतीचे प्रयत्न करत होते. ब्रीद त्यांच्या मदतीमुळे जान्हवीचे कोल्हापूर येथे शस्त्रक्रिया करून निकामी डोळा काढून कृत्रिम डोळा बसवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT