कोकण

कुडाळात छायाचित्रांचे प्रदर्शन

CD

24925
कुडाळ ः भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफी आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना प्रकाश पेठे. बाजूला भूषण जडये, सुधीर जडये, आर्या जडये, हेमंत जडये आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळात छायाचित्रांचे प्रदर्शन
कुडाळ, ता. २१ ः जागतिक छायाचित्र दिनानिमित्त येथील भूषण जडये फोटोग्राफी स्कूलच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे प्रा. प्रकाश पेठे यांच्या हस्ते शनिवारी (ता. १९) प्रदर्शनाचे उद्‌घाटन आले. यावेळी फोटोग्राफी संकुलाचे संचालक भूषण जडये आणि आर्या जडये, ज्येष्ठ फोटोग्राफर सुधीर जडये, हेमंत जडये, डॉ. रुपेश धुरी, केदार सामंत आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्कूलमधील विद्यार्थ्यांनी काढलेले निवडक फोटो या प्रदर्शनात मांडले होते. उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांसह त्यांना फोटोग्राफीचे धडे देणाऱ्या भूषण जडये यांचे कौतुक केले. या प्रदर्शनात टेबलटॉप फोटोग्राफी, विषयानुरूप फोटोग्राफी, लँडस्केप, पोर्ट्रेट अशा विविध प्रकारच्या फोटोंची आकर्षक मांडणी करण्यात आली. डॉ. रुपेश धुरी, शिल्पा नायबागकर, अवधूत राणे, अमेय जोशी, नीलेश जोशी, पंकज खरवडे, सिद्धेश प्रभू या विद्यार्थ्यांनी काढलेले फोटो प्रदर्शनात मांडण्यात आले होते. १९, २० आणि २१ ऑगस्ट असे तीन दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT