कोकण

गुहागर

CD

24972

गुहागर समुद्रकिनारी
सापडला २० किलो चरस
कस्टम अधीक्षक जयकुमार; अधिकाऱ्यांनी वाढविली गस्त
गुहागर, ता. २१ : तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी कस्टम विभागाला २ बेवारस गोणीत चरस या अंमली पदार्थाची १८ पाकीटे होती. त्यांचे वजन २० किलो ७०० ग्रॅम होते. ही पाकिटे कस्टम विभागाने ताब्यात घेतली असून तालुक्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर कस्टमचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत आहेत, अशी माहिती बोऱ्या कस्टमचे अधीक्षक जय कुमार यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कद्रे, लाडघर,केळशी, कोळथळे, मुरुड, बुरोंडी, दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत चरस या अंमली पदार्थाची पाकीटे सापडल्याने कस्टम, पोलीस सावध झाले. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यास सुरुवात केली. यामध्ये १९ ऑगस्टला बोऱ्या येथील समुद्रकिनाऱ्यांवर २ गोणी आढळल्या. बेवारस गोणी कस्टम विभागाने ताब्यात घेऊन पाहणी केली असता गोण्यांमध्ये अन्य ठिकाणी सापडलेल्या पाकिटांप्रमाणेच छोटी पाकिटे होती. पाकिटांमध्ये चरस २० किलो ७०० ग्रॅम हा अंमली पदार्थ होता. त्यामुळे जिल्ह्यात सापडलेल्या एकूण अंमली पदार्थांचे वजन आता २५० किलो इतके झाले आहे.
या संदर्भात कस्टमचे अधीक्षक जय कुमार म्हणाले, ‘‘गुहागर तालुक्यात तसेच अन्य कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर निळ्या रंगाच्या गोणी सापडल्यास त्याची माहिती द्या असे आवाहन केले आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी छापा टाकून एखाद्याकडील अंमली पदार्थांचे पाकीट जप्त केल्यास संबंधितांवर नार्कोटिक्स ड्रग्ज् प्रतिबंधित कायद्याप्रमाणे १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कोणीही समुद्रकिनाऱ्यावरील निळ्या रंगाच्या गोणी किंवा पाकीटे स्वत:जवळ बाळगू नयेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

Telangana Politics : तेलंगणच्या राजकारणात कन्येचे वडिलांना आव्हान; ‘बीआरएस’ला कविता यांची ‘टीआरएस’ धक्का देणार?

Nashik News : ‘टीसीएस’मधील दानिशच्या मोबाईलचा ‘क्लोनिंग’ अहवाल ‘एसआयटी’कडे

विदर्भात उष्णतेची लाट कायम; सोमवारी अमरावती सर्वाधिक हॉट, ४६.६ अशं तापमानाची नोंद; अकोल्याला टाकलं मागे...

SCROLL FOR NEXT