कोकण

सावंतवाडीत नारळी पौर्णिमा जल्लोषात

CD

26938
सावंतवाडी ः येथील मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करताना पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी. शेजारी राजेसाहेब खेमसावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, श्रद्धाराजे भोसले आदी.

सावंतवाडीत नारळी पौर्णिमा जल्लोषात

मोती तलावात नारळ अर्पण; पारंपरिक सोहळ्यास नागरिकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.
सावंतवाडी पोलिसांकडून मानाच्या श्रीफळाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक वाजतगाजत मोती तलाव काठावर आली‌. सावंतवाडी संस्थानच्या व मानाच्या नारळाची पूजा राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली‌. त्यानंतर प्रतिकात्मक सोन्याचा नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनी नारळ अर्पण केले. यावेळी मोती तलावाभोवती मोठी गर्दी पाहायला मिळाली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावतीनेही तलावात नारळ अर्पण करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना परब, पूजा दळवी, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, श्री. पोतनीस, सोमण गुरुजी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT